Join us
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनचा लाभ सुरु ठेवण्यासाठी हयातीचा दाखला आवश्यक, कसा मिळवायचा हा दाखला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 14:14 IST

Pension Scheme : म्हणूनच जे पेन्शनधारक आहेत, अशा नागरिकांना हयातीचा दाखला अनिवार्य करण्यात आला आहे. 

Pension Scheme : म्हातारपणात आधार म्हणून पेन्शनकडे कडे पाहिले जाते. पण अलीकडे सगळी व्यवस्था ऑनलाईन झाल्याने अनेक कागदपत्रांची आवश्यकता भासते. म्हणूनच जे पेन्शनधारक आहेत, अशा नागरिकांना हयातीचा दाखला अनिवार्य करण्यात आला आहे. 

हयातीचा दाखला सादर करण्याआधी पेन्शनधारक जीवंत आहे, हे ठरवावं लागतं. म्हणजेच पेन्शनधारक हयात असून त्याला मिळणारा लाभ यापुढेही सुरु राहावा, यासाठी हयातीचा दाखला मिळवणं गरजेचं असतं. आता हा दाखला नेमका कसा मिळवायचा, हे आपण पाहणार आहोत... 

नवीन नोंदणीसाठी काय कराल? अ‍ॅप डाउनलोड करा : सर्वप्रथम केंद्र सरकारचे Jeevan Pramaan हे अ‍ॅप डाउनलोड करा.नोंदणी करा : त्यानंतर या अ‍ॅपमध्ये जाऊन 'Register as new user' वर क्लिक करा.माहिती भरा : तुमचा आधार क्रमांक, नाव, बँक खाते क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) आणि इतर आवश्यक माहिती भरा.OTP मिळवा: 'Send OTP' वर क्लिक करा आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला OTP भरा.प्रमाण आयडी मिळवा : माहितीची पडताळणी झाल्यानंतर सबमिट करा. तुम्हाला एक 'प्रमाण आयडी' जनरेट होईल. 

हयातीचा दाखला (Digital Life Certificate) तयार करा. 

  • लॉगिन करा : जनरेट झालेल्या प्रमाण आयडी आणि दुसऱ्या OTP च्या मदतीने अ‍ॅपमध्ये पुन्हा लॉगिन करा.
  • जीवन प्रमाण पर्याय निवडा : या ठिकाणी 'Generate Jeevan Pramaan' पर्यायावर क्लिक करा.
  • माहिती भरा : पुन्हा आधार क्रमांक, मोबाइल नंबर आणि PPO क्रमांक अशी माहिती भरा.
  • बायोमेट्रिक पडताळणी करा : म्हणजेच तुमचा आधार डेटा वापरून तुमचा फिंगरप्रिंट (बोटांचे ठसे) आणि आयरिस स्कॅनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करा.
  • प्रमाणपत्र मिळवा : हि सर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, तुमचा हयातीचा दाखला (Digital Life Certificate) तयार होईल आणि तुम्हाला SMS द्वारे कन्फर्म चा मॅसेज येईल. 
English
हिंदी सारांश
Web Title : Life Certificate for Pension: How to Obtain It Easily?

Web Summary : Pensioners need a life certificate to continue receiving benefits. The Jeevan Pramaan app simplifies this. Register, verify details via OTP, and use biometric authentication to generate your digital life certificate.
टॅग्स :निवृत्ती वेतनशेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीसरकारी योजना