Organic Weed Control : शेतकऱ्यांना सतावणारे गाजर गवत आता नैसर्गिकरीत्या नष्ट करण्याची संधी आली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे फक्त २ रुपयांत 'झायगोग्रामा' भुंगे उपलब्ध असून, हे भुंगे गाजर गवतावर उपजीविका करून त्याचा नाश करतात.(Organic Weed Control)
शेतजमिनी, रस्त्याच्या कडेला व पिकांमध्ये वेगाने पसरणारे गाजर गवत हे तण शेतकऱ्यांसाठी मोठे डोकेदुखीचे ठरत आहे. या तणावर प्रभावी नियंत्रणासाठी 'झायगोग्रामा' (मेक्सिकन) भुंगे विक्रीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागातील परोपजीवी कीटक संशोधन योजनेत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.(Organic Weed Control)
हे भुंगे गाजर गवतावर उपजीविका करून त्याची वाढ रोखतात आणि कालांतराने तण पूर्णपणे नष्ट करतात.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथून शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Organic Weed Control)
भुंग्यांची किंमत व प्रमाण
विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, प्रती भुंगा फक्त २ रुपये दराने उपलब्ध आहे.
प्रती एकरी : २०० भुंगे
प्रती हेक्टरी : ५०० भुंगे
या प्रमाणात शेतात किंवा गाजर गवत वाढलेल्या जागी सोडल्यास तण नियंत्रणास मदत होते.
संपर्कासाठी माहिती
भुंगे खरेदीसाठी इच्छुकांनी आगाऊ नोंदणी करावी.
जी. एस. खरात – ९६३७०६७७०५
डॉ. एस. एस. धुरगुडे – ८८३०७७६०७४
यांच्याशी परोपजीवी कीटक संशोधन योजना, कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.
गाजर गवतावर झायगोग्रामाचा परिणाम
तज्ज्ञांच्या मते, गाजर गवत हे पिकांचे पोषणद्रव्य आणि पाण्यावर ताबा मिळवून उत्पादन घटवते, तसेच मानव आणि प्राण्यांच्या आरोग्यास हानीकारक असते. झायगोग्रामा भुंगे गाजर गवताच्या पानांवर व खोडावर कुरतडून त्याचा नाश करतात. हा उपाय रासायनिक तणनाशकांपेक्षा पर्यावरणपूरक व दीर्घकालीन आहे.
झायगोग्रामा (मेक्सिकन) भुंगे वापरण्याचे शेतकऱ्यांना बरेच फायदे
* गाजर गवतावर नैसर्गिक नियंत्रण
हे भुंगे गाजर गवताच्या पानांवर व खोडावर कुरतडून त्याची वाढ थांबवतात.
काही दिवसांतच तण कमजोर होऊन कोमेजते.
* रासायनिक तणनाशकांचा वापर टाळता येतो
रसायनांचा खर्च व आरोग्यावरील परिणाम कमी होतो.
माती व पाण्याचे प्रदूषण टळते.
* खर्च कमी
फक्त ₹२ प्रति भुंगा या दराने उपलब्ध असल्यामुळे हा उपाय किफायतशीर आहे.
एकरी फक्त २०० भुंगे सोडून चांगला परिणाम मिळतो.
* पर्यावरणपूरक उपाय
जैविक पद्धतीने तण नियंत्रण केल्यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही.
पक्षी, मधमाशा व इतर उपयुक्त कीटकांवर याचा नकारात्मक परिणाम होत नाही.
* दीर्घकालीन परिणाम
एकदा भुंगे सोडल्यानंतर ते गाजर गवत असलेल्या परिसरात नैसर्गिकरीत्या वाढतात.
पुढील हंगामातही तणावर नियंत्रण राहते.
* आरोग्याची काळजी
गाजर गवताच्या परागकणांमुळे होणारे अॅलर्जी, अस्थमा आणि त्वचारोग कमी होण्यास मदत.
जनावरांच्या चाऱ्यात मिसळून होणारे विषारी परिणाम टळतात.