Rokel Vatap : सद्यस्थितीत भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र शासनाने १२ मार्च रोजीच्या आदेशान्वये राज्यास ३ हजार ७४४ कि.ली. एवढे नियतन मंजूर केले आहे. त्यानुषंगाने एलपीजीला पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरुपात केरासिन वितरण करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती.
त्यानुषंगाने नाशिक जिल्ह्यासाठी २२८ कि. लि. केरोसिन नियतन संदर्भ क्र. १२ अन्वये देण्यात आले आहे. २३ मार्च रोजी मा. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांनी घेण्यात आलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे दिलेल्या सुचनेनुसार तहसिलदार व धाविअ नाशिक / मालेगांव यांचे मार्फत केरोसिन मागणी कळविलेली आहे.
केरोसिन वाटपाचे प्रमाणएकूण वाटप : केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यास ३ हजार ७४४ लिटर केरोसीन वाटप केले आहे.प्रति लाभार्थी : प्रति कुटुंब / प्रति शिधापत्रिका ३ (तीन) लिटर केरोसीन अनुज्ञेय राहील.
कुणाला मिळणार रॉकेल
- AAY व PHH शिधापत्रिकाधारकांना केरोसिन वितरणास प्राधान्य देण्यात येईल.
- केरोसीन विक्रीस मिळत असलेल्या प्रतिसादाचा विचार करुन केरोसीन उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक देखील केरोसीन मिळण्यास पात्र असतील.
- ज्या कुटंबाकडे शिधापत्रिका नाही असे कुटुंब देखील केरोसीन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र राहतील. (ग्रामपंचायत रहिवासी दाखला पुरावा ग्राहय धरण्यात यावा.
- स्थलांतरीत मजूर देखील केरोसीन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र राहतील (केंद्र शासनाचे / राज्य शासनाचे ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राहय धरण्यात यावे.)
ज्याअर्थी, नाशिक जिल्हयातील एकूण शिधापत्रिका विचारात घेऊन जिल्हयाची तालुकानिहाय / धान्य वितरण अधिकारी क्षेत्रनिहाय केरोसिन नियतन निश्चित करण्यात आलेले आहे. नाशिक जिल्हयासाठी मंजुर केरोसिन २२८ कि. लि. असुन प्राप्त केरोसिन नियतन खाली नमुद केलेप्रमाणे वाटप करण्यात येत आहे.
तालुका निहाय किती रॉकेल मिळणार?
येवला, निफाड, चांदवड, बागलाण, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, देवळा : १२ हजार लिटर त्र्यंबकेश्वर, नाशिक ग्रामीण, इगतपुरी, दिंडोरी, कळवण, सुरगाणा, पेठ : १८ हजार लिटरधाविअ नाशिक, धाविअ मालेगाव : ३ हजार लिटर
अशा प्रमाणात तालुकानिहाय रॉकेल वाटप होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या सर्व तालुक्यांना पानेवाडी डेपो येथून हे रॉकेल वाटप होणार आहे. त्यानुसार तालुका प्रशासनाला येथून रॉकेलची उचलण्यास आदेश देण्यात आले आहेत.
रॉकेल वाटपासाठी पुरवठा विभागाकडून घरोघरी सर्व्हे, 'ही' अट बंधनकारक, तरच मिळणार रॉकेल
Web Summary : Due to LPG shortages, Maharashtra will distribute kerosene. Priority will be given to AAY and PHH cardholders, with 3 liters per family. Distribution will happen via designated depots, with varying amounts allocated per taluka based on need and availability.
Web Summary : एलपीजी की कमी के कारण, महाराष्ट्र केरोसिन वितरित करेगा। एएवाई और पीएचएच कार्डधारकों को प्राथमिकता दी जाएगी, प्रति परिवार 3 लीटर। वितरण नामित डिपो के माध्यम से होगा, आवश्यकता और उपलब्धता के आधार पर प्रत्येक तालुका को अलग-अलग मात्रा आवंटित की जाएगी।