Join us
Daily Top 2Weekly Top 5

Orange Processing Center : वादळात पडलेली संत्रेसुद्धा उपयोगी; प्रक्रिया उद्योग सुरू होणार? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:46 IST

Orange Processing Center : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. संत्र्यावर प्रक्रिया करून रस, मुरंबा, तेल आणि इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यासाठी मंजूर केलेल्या आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रांना शासनाने दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. तब्बल २० कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना स्थिर बाजार मिळण्याची, पडलेली किंवा नुकसानग्रस्त संत्रेसुद्धा उपयोगी पडण्याची आणि नवीन रोजगारनिर्मितीची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. (Orange Processing Center)

Orange Processing Center : विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टी, वादळ, गारपीट आणि बाजारातील घसरण यामुळे गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. (Orange Processing Center)

अशा परिस्थितीत संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू होणे ही काळाची गरज बनली आहे. संत्र्यावर प्रक्रिया करून रस, जॅम, मुरंबा, तेल, सुगंधी पदार्थ आणि उच्च मूल्याची उत्पादने तयार केल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.(Orange Processing Center)

राज्य शासनाने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात संग्रामपूर तालुक्यासाठी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रांसाठी तब्बल २० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. या प्रकल्पाचे काम अपेक्षित गतीने न झाल्याने शासनाने नुकतीच दोन वर्षांची मुदतवाढ देत प्रकल्पात आवश्यक बदल करण्यास मान्यता दिली आहे.(Orange Processing Center)

संत्रा प्रक्रिया केंद्रांमुळे होणार मोठा लाभ

काढणीपश्चात होणारे संत्र्यांचे नुकसान कमी

शेतकऱ्यांना योग्य आणि स्थिर बाजारभावाची हमी

प्रक्रिया केलेली उत्पादने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात

शेतकऱ्यांना अतिरिक्त रोजगार व उत्पन्न

खराब, वादळग्रस्त किंवा गारपीट झालेल्या संत्र्यांचाही प्रभावी उपयोग

तज्ज्ञांच्या मते, गारपीट किंवा वादळामुळे खराब झालेल्या संत्र्यांमध्येही १८% पर्यंत साखर असते. त्यामुळे त्यावर प्रक्रिया करताना अतिरिक्त साखरेची गरज भासत नाही. यामुळे प्रक्रिया खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

केंद्र सुरू कधी होणार?

मुदतवाढ मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार? हा प्रश्न संत्रा उत्पादकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. केंद्र सुरू झाल्यास संत्रा उत्पादकांना स्थिर बाजार मिळून आर्थिक दिलासा मिळेल, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

सध्या निधीचे वितरण आणि प्रक्रिया केंद्रांचे प्रत्यक्ष उभारणीचे काम विलंबित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.

कोणती केंद्रे उभारली जाणार?

संग्रामपूर तालुक्यासाठी मंजूर केंद्र कोणती?

२ प्राथमिक संत्रा प्रक्रिया केंद्रे – प्रत्येकी ८ कोटी

२ दुय्यम केंद्रे – प्रत्येकी ८० लाख

१ उपपदार्थ केंद्र – ३० लाख

मूळ योजनेनुसार हे प्रकल्प दोन आर्थिक वर्षांत पूर्ण करणे बंधनकारक होते. ही केंद्रे कार्यान्वित झाल्यास संग्रामपूर तालुका विदर्भातील संत्रा प्रक्रिया उद्योगाचे केंद्रबिंदू ठरू शकतो.

या प्रकल्पाला मान्यता मिळवून देण्यात आ. डॉ. संजय कुटे यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

संत्रापासून वाइन उत्पादनाचीही शक्यता!

महाराष्ट्रात सध्या द्राक्षांपासून वाइन तयार करणाऱ्या शंभराहून अधिक वायनरी कार्यरत आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की, संत्र्यापासूनही उच्च प्रतीची वाइन तयार होऊ शकते, आणि ती बाजारात मोठी मागणी मिळवू शकते.

द्राक्षांच्या तुलनेत संत्रे स्वस्त असल्याने उत्पादन खर्चही कमी येईल. त्यामुळे उद्योगांना हे क्षेत्र अत्यंत लाभदायक ठरू शकते.

संत्रा प्रक्रियेने होणारा दिलासा

उत्पादनाला स्थिर बाजार

खराब व पडलेली फळेही उपयोगी

शेतकऱ्यांचा खर्च कमी

विदर्भातील संत्रा उत्पादकांना नवीन संधी

निर्यात वाढण्याची मोठी क्षमता

हे ही वाचा सविस्तर : Orange Farmers Crisis : संत्रा उत्पादकांचे डागाळलेले नशीब; नैसर्गिक आपत्ती आणि कमी भावामुळे आर्थिक कोंडी वाढली!

English
हिंदी सारांश
Web Title : Orange Processing Industry Needed to Relieve Orange Producers

Web Summary : To aid struggling orange farmers, processing units are crucial. Government extended the deadline for modern plants, aiming to boost farmer income and utilize damaged fruit. The project faces delays despite allocated funds, hindering potential for diverse orange products.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीविदर्भ