Join us
Daily Top 2Weekly Top 5

मल्चिंग पेपरवर कांदा लागवडीसाठी एकरी किती खर्च येतो, किती उत्पादन मिळते? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 14:50 IST

Kanda Lagvad : आता शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकत कांदा पीक मल्चिंग पेपरवर घेणे सुरू केले आहे.

नाशिक : जिल्ह्यात कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शेतकरी कांदा लागवडीसाठी विविध प्रयोगाचा अवलंब करत आहेत. मजुरांची टंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनी यंत्राच्या सहाय्याने कांदा लागवडीवर भर दिला आहे. टोमॅटो, काकडी, मिरची, टरबूज, खरबूज, वांगी यासाठी मल्चिंग पेपर अंथरून लागवड केली आहे.

आता शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकत कांदा पीक मल्चिंग पेपरवर घेणे सुरू केले आहे. येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शेतकरी बापूसाहेब नरोडे यांनी तीन एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपर अंथरून कांदा लागवड केली आहे. तीन एकर क्षेत्राची मशागत करून त्यावर खते टाकून मल्चिंग पेपर अंथरला आहे. 

विशेष म्हणजे एक एकरमध्ये तीन लाख आठ हजार कांदा रोपे लावली आहेत. कांदा उत्पादक पट्टयात गेल्या काही वर्षात लागवड पद्धतीत बदल होत आहे. जिल्ह्यात अलीकडे मल्चिंग पेपरवर लागवड होत आहे. ही पद्धत उत्पादन वाढ, पाण्याची बचत, मजूर टंचाईसाठी प्रभावी आहेत.

एकरी खर्च असारासायनिक खते एकरी १५ हजार रु.मल्चिंग पेपर एकरी १० हजार रु.साधे ठिबक सिंचन १० हजार रु.

गेल्या अनेक वर्षांपासून ठिबक सिंचनावर कांदा लागवड घेत होतो. मल्चिंग पेपरवर कांदा लागवड करण्याचा निर्णय घेतला. मल्चिंग पेपरवर ४ बाय ४ इंच अंतर असून, आडव्या ओळीत १० रोपे लागतात. एकरी एकरी तीन लाखांवर रोपांची लागवड झाली आहे यामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहेत.- बापूसाहेब नरोडे, शेतकरी, पिंपळगाव

टॅग्स :कांदालागवड, मशागतशेतीशेती क्षेत्र