Join us

Oilseeds Unit : तेलबिया युनिटसाठी लाखोंचे अनुदान; शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची नवी योजना वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:20 IST

Oilseeds Unit : शेतकऱ्यांना शेतीमालाच्या मूल्यवर्धनासाठी केंद्र शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय खाद्य तेल अभियान (गळीतधान्य) २०२५-२६ अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था तसेच खासगी आणि शासकीय उद्योगांसाठी तेलबिया प्रक्रिया युनिट आणि गोदाम उभारणीसाठी लाखो रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. (Oilseeds Unit)

Oilseeds Unit : शेतकऱ्यांना शेतीमालाच्या मूल्यवर्धनासाठी केंद्र शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय खाद्य तेल अभियान (गळीतधान्य) २०२५-२६ अंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्सहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.(Oilseeds Unit)

शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था तसेच खासगी आणि शासकीय उद्योगांसाठी तेलबिया प्रक्रिया युनिट आणि गोदाम उभारणीसाठी लाखो रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.(Oilseeds Unit)

तेल काढणी युनिटसाठी ९.९० लाख रुपयांपर्यंत अनुदान

सोयाबीन, सूर्यफूल आणि इतर तेलबिया पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा सुवर्णसंधीचा लाभ ठरणार आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तेल काढणी युनिट उभारणीसाठी प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के अनुदान मिळणार आहे.

या मर्यादेत ९.९० लाख रुपये अनुदान मंजूर केले जाईल

यांना ही सवलत लागू

* शासकीय व खासगी उद्योग

* शेतकरी उत्पादक कंपन्या

* सहकारी संस्था

२५० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामासाठी १२.५० लाख अनुदान

शेतकऱ्यांच्या उत्पादन साठवणुकीच्या अडचणी सोडवण्यासाठी योजनेत गोदाम उभारणीसाठीही प्रावधान आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या, वखार महामंडळ किंवा नाबार्ड मान्य प्रकल्पानुसार अर्ज सादर करू शकतात.

या अंतर्गत ५० टक्के किंवा १२.५० लाख रुपये (जे कमी असेल तेवढे) अनुदान देण्यात येणार आहे.

बँकेकडून कर्ज मंजूरी झाल्यानंतरच अनुदानासाठी पात्रता प्राप्त होईल.

२५ जुलैपर्यंत करा अर्ज

सर्व अर्जदारांनी आपले प्रकल्प प्रस्ताव २५ जुलै २०२५ पूर्वी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.

अर्जकर्त्यांची संख्या जास्त झाल्यास जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेनुसार सोडत पद्धतीने निवड केली जाईल.

आवश्यक कागदपत्रे

शेतजमिनीचे सातबारा / ८ अ

शेतकरी उत्पादक संस्थेची नोंदणी

बँक कर्ज प्रस्ताव व मंजूरी

प्रकल्प अहवाल

कृषी विभागाचे आवाहन

ही योजना केवळ पायाभूत सुविधा देणारी नाही, तर शेतीमालाचे मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणारी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी व उत्पादक कंपन्यांनी याचा लाभ घ्यावा.- मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

हे ही वाचा सविस्तर : Micro Irrigation : सूक्ष्म सिंचनासाठी सुवर्णसंधी! शेतकऱ्यांना मिळणार थेट खात्यात अनुदान वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीतेल शुद्धिकरण प्रकल्पसोयाबीनकरडईकृषी योजनाकेंद्र सरकार