Join us

Nursery Plants For Farmers: शेतकऱ्यांना मिळणार कमी खर्चात दर्जेदार रोपे; कुठे, कसे वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 12:55 IST

Nursery Plants For Farmers: मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. जालना येथील कृषी विज्ञान केंद्राने दर्जेदार फळझाडे, औषधी व शोभिवंत रोपे अवघ्या २० ते १०० रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. केशर आंबा, ड्रॅगनफ्रूट, कडुनिंब, बदामसारख्या झाडांची रोपे अगदी स्वस्त दरात घेऊन बागायती स्वप्न साकार करण्याची ही सुवर्णसंधी आहे.(Nursery Plants For Farmers)

Nursery Plants For Farmers : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. जालना येथील कृषी विज्ञान केंद्राने दर्जेदार फळझाडे, औषधी व शोभिवंत रोपे अवघ्या २० ते १०० रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत.(Nursery Plants For Farmers)

केशर आंबा, ड्रॅगनफ्रूट, कडुनिंब, बदामसारख्या झाडांची रोपे अगदी स्वस्त दरात घेऊन बागायती स्वप्न साकार करण्याची ही सुवर्णसंधी आहे.(Nursery Plants For Farmers)

मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या खरपुडी (जालना) येथील कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी नवीन उपक्रम राबवित असते. यंदाही विविध प्रकारच्या दर्जेदार रोपे आणि कलमे उपलब्ध करून दिली जात आहेत.(Nursery Plants For Farmers)

शेतकऱ्यांसाठी स्वस्त दरात आणि खात्रीशीर प्रतीची रोपे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत.

काय आहे उपलब्ध?

केंद्राच्या रोपवाटिकेत फळबाग, शोभिवंत झाडे, औषधी झाडे यांची एकूण २४ जातींच्या रोपे/कलमे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत.

यात केशर आंब्याचे कलम, रायगड जांभूळ, वालानगर सिताफळ, प्रतिक्षण चिंच, साईसरस्वती लिंबू, रेड-व्हाईट ड्रॅगनफ्रुटसारखी फळझाडे, तसेच बाभूळ, करवंद, बेल, कडुनिंब, बदाम, रिठा, जास्वंद, जाट्रोफा यांसारखी स्थानिक व औषधी झाडांची रोपे उपलब्ध आहेत.

कसे आहेत रोपांचे दर?

लाल-पांढरा ड्रॅगनफ्रुट : प्रती रोप २० रुपये

केशर आंबा कलम : प्रति रोप ९० रुपये

इतर बहुतांश रोपे २५ रुपये प्रती रोप या दराने उपलब्ध आहेत.

विशेष : अडेनियम लाल-पांढरा रोप १०० ला विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

शेतकरी आणि बागायतदारांनी या संधीचा लाभ घेऊन कमी दरात दर्जेदार रोपे खरेदी करावीत, असे आवाहन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

येथे संपर्क साधा 

प्रा. सुनील कळम, विषयतज्ज्ञ (उद्यानविद्या),डॉ. श्रीकृष्ण सोनुने, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, विशाल तोर, प्रक्षेत्र व्यवस्थापक यांनी कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी (जालना) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Smart Project : स्मार्ट प्रकल्पाचा परिणाम; शेतकऱ्यांना दरमाहितीचा डिजिटल पर्याय वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीशेतीजालना