Join us

Nuksan Bharpayee : दिवाळीपूर्वी मदतीचे आश्वासन 'कागदावर'; ई-केवायसी अडथळ्यामुळे वितरणात संथगती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 10:35 IST

Nuksan Bharpayee : मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अजूनही शासकीय मदतीची वाट पाहत आहेत. शासनाने जाहीर केलेल्या ३ हजार १८२ कोटी रुपयांपैकी केवळ ९०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. उर्वरित मदत ई-केवायसी (E-KYC) प्रक्रियेत अडकली आहे. दिवाळीपूर्वी मदत मिळण्याचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्षात निधी वाटपाची गती अत्यंत संथ आहे. (Nuksan Bharpayee)

छत्रपती संभाजीनगर : जुलै ते सप्टेंबर २०२५ या तीन महिन्यांत मराठवाड्यावर अवकाळी व अतिवृष्टीचं मोठे संकट आले. सलग पावसामुळे लाखो एकर शेती, हजारो जनावरे आणि शेकडो घरं उद्ध्वस्त झाली. (Nuksan Bharpayee)

राज्य सरकारने तत्काळ ३ हजार १८२ कोटी रुपयांचा मदतनिधी जाहीर करत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, वास्तवात फक्त ९०० कोटी रुपयेच बँक खात्यांवर जमा झाल्याने शेतकरी अजूनही मदतीची प्रतीक्षा करत आहेत. (Nuksan Bharpayee)

अतिवृष्टीचं प्रमाण आणि नुकसान

३० सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, ३१ लाख ९८ हजार ४६७ हेक्टर शेतीतील पिके पाण्यात गेली.

सुमारे ३० लाख शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

५ हजारांहून अधिक जनावरे दगावली.

शंभराहून अधिक मृत्यू नोंदवले गेले.

हजारो घरांची पडझड झाली.

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ९०० हून अधिक मंडळांत अतिवृष्टी झाली. सर्वाधिक नुकसान लातूर, नांदेड, बीड, जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये झाले.

पण वितरण अडकलेले

शासनाने ३१८२ कोटी रुपयांच्या मदतीसाठी चार अध्यादेश काढले :

पहिला – १४१८ रु. कोटी (जून-जुलैतील नुकसान)

दुसरा – ६५ रु. कोटी

तिसरा – १३५३ रु. कोटी

चौथा – ३४६ रु. कोटी

एकूण ३१८२ कोटींपैकी फक्त ९०० कोटी म्हणजेच सुमारे ३० टक्के रक्कमच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. उर्वरित निधी दिवाळीनंतर जमा होईल, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

ई-केवायसीमुळे वितरणात अडथळा

मदतनिधीचे वितरण ई-केवायसी पडताळणीवर अवलंबून असल्याने प्रक्रिया संथगतीने सुरू आहे.

ज्यांनी यापूर्वी फार्मर आयडी व ई-केवायसी पूर्ण केली आहे, त्यांना रक्कम मिळाली.

बाकी शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय निधी मिळणार नाही.

बहुतांश नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया प्रलंबित असल्याने रक्कम अडकलेली आहे.

जिल्हानिहाय नुकसानाचा आढावा (हेक्टरमध्ये)

जिल्हाशेतीचे नुकसान (हे.)
छत्रपती संभाजीनगर२,३६,५२८
जालना२,३२,०८२
परभणी२,७३,०३३
हिंगोली२,७३,४१३
नांदेड६,५४,४०१
लातूर६,७५,८९१
धाराशिव४,४९,६८१
बीड४,०३,४३८
एकूण३१,९८,४६७

शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि सरकारचं आश्वासन

शासनाने दिवाळीपूर्वी मदत खात्यावर जमा होईल असं आश्वासन दिलं असलं, तरी प्रत्यक्षात अनेक शेतकरी अजून प्रतीक्षेत आहेत. अनेक गावांमध्ये अजूनही शेतात पाणी साचलेलं असून, कापूस, सोयाबीन, मका आणि तूर पिकांचं मोठं नुकसान झाले आहे.

सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, मदत वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. तांत्रिक कारणांमुळे काही विलंब झाला असला, तरी उर्वरित निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल.

मराठवाड्यातील शेतकरी सलग तिसऱ्या वर्षी पावसाच्या तडाख्यात सापडले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेला मदतनिधी अद्याप पूर्ण न मिळाल्याने त्यांच्या दिवाळीची आनंदछटा फिकी पडली आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा प्रत्यक्षात किती परिणाम होतो, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : IMD अलर्ट : कोकण ते विदर्भ मुसळधार पुन्हा पावसाचा इशारा वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada Farmers Await Full Aid: Only 30% of Funds Disbursed

Web Summary : Marathwada farmers, hit by heavy rains, received only 30% of promised aid before Diwali. Of the ₹3182 crore allocated, only ₹900 crore reached accounts. E-KYC delays hinder disbursement, leaving many awaiting relief. Nanded and Latur saw the most aid distribution.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीमराठवाडा