Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > कुरडई अन् शेवया पांढऱ्या शुभ्र आणि खुसखुशीत होण्यासाठी 'हा' गहू बेस्ट, वाचा सविस्तर 

कुरडई अन् शेवया पांढऱ्या शुभ्र आणि खुसखुशीत होण्यासाठी 'हा' गहू बेस्ट, वाचा सविस्तर 

Latest News 'NIDW 1149' Wheat Used for Making Kurdaya and Shevaya read in details | कुरडई अन् शेवया पांढऱ्या शुभ्र आणि खुसखुशीत होण्यासाठी 'हा' गहू बेस्ट, वाचा सविस्तर 

कुरडई अन् शेवया पांढऱ्या शुभ्र आणि खुसखुशीत होण्यासाठी 'हा' गहू बेस्ट, वाचा सविस्तर 

Kurdai Shevya : कुरडया, शेवया बनविण्यासाठी विशिष्ट गव्हाचा उपयोग केला जातो.

Kurdai Shevya : कुरडया, शेवया बनविण्यासाठी विशिष्ट गव्हाचा उपयोग केला जातो.

Kurdai Shevya : कुरडया, शेवया आणि पापड बनवण्यासाठी हा काळ अगदी योग्य असतो. महाराष्ट्रात याला 'वाळवण' असे म्हणतात. आता ग्रामीणभागासह शहरी भागात हे वाळवण तयार करण्याची लगबग सुरु झाली आहे. कुरडया, शेवया बनविण्यासाठी विशिष्ट गव्हाचा उपयोग केला जातो. तो गहू कोणता, आणि गव्हाचे आणखी कोणते वाण आहेत, ते कशासाठी वापरले जातात, ते पाहुयात... 

सध्या गहू काढणीचा हंगाम सुरु असून नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे गहू संशोधन केंद्र आहे. या ठिकाणी गव्हाच्या विविध वाणांची निर्मिती करण्यात आली आहे. नुकत्याच कृषी कुंभ २०२६ मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली निफाड येथील कृषी संशोधन केंद्राने सहभाग नोंदवला आहे. या ठिकाणी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या गहू वाणांची माहिती देण्यात आली. 

यामध्ये कमी पाण्यावर येणाऱ्या 'फुले अनुपम' व 'फुले अनुराग', बिस्किटासाठी उपयुक्त 'फुले सात्त्विक', उच्च पोषणमूल्य असलेला 'फुले संपन्न', तर कुरडया, शेवया, रवा व पास्ता निर्मितीसाठी उपयुक्त 'एनआयडीडब्ल्यू ११४९' या गव्हाच्या वाणांचीही या प्रदर्शनात मांडणी करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला. 

'एनआयडीडब्ल्यू ११४९' गहू 
कुरडया आणि शेवया बनवण्यासाठी जाडा आणि भरपूर चीक असलेला गहू सर्वात उत्तम मानला जातो. कुरडई पांढरीशुभ्र आणि खुसखुशीत होण्यासाठी गव्हाची निवड महत्त्वाची असते. 'एनआयडीडब्ल्यू ११४९' (NIDW 1149) ही गव्हाची एक आधुनिक आणि प्रगत जात असून ती प्रामुख्याने कुरडया आणि शेवया बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते

गव्हाच्या एकूण ३२ वाण विकसित
कृषी संशोधन केंद्र, निफाड यांनी बन्सी आणि शरबती गटातील मिळून गव्हाच्या एकूण ३२ जाती विकसित केल्या आहेत. महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले ३ 'फुले समाधान' हे वाण शेतकरी आणि नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे.

 

 हेही वाचा : जमीन मालकीचा पुरावा नाही, 12 वर्ष जमिनीवर ताबा आहे, मालकी सांगता येते का, काय सांगतो कायदा?

 

Web Title : कुरडई और सेवई के लिए सबसे अच्छा गेहूं: पूरी जानकारी यहां

Web Summary : निफाड गेहूं अनुसंधान ने 'एनआईडीडब्ल्यू 1149' को कुरडई और सेवई के लिए आदर्श बताया, क्योंकि इसमें मोटाई और ग्लूटेन की मात्रा अधिक है। इस किस्म को 31 अन्य किस्मों के साथ निफाड कृषि अनुसंधान केंद्र में विकसित किया गया, जिसमें 'फुले समाधान' भी शामिल है, जो किसानों के बीच एक लोकप्रिय विकल्प है।

Web Title : Best wheat for white, crispy Kurdai and Shevaya: Details here.

Web Summary : NIFAD wheat research identifies 'NIDW 1149' as ideal for Kurdai and Shevaya due to its thickness and gluten content. This variety, along with 31 others, was developed at the NIFAD Agricultural Research Centre, including 'Phule Samadhan', a popular choice among farmers.