Join us

Natural Farming : वाशिमच्या गायवळमधून शाश्वत शेतीचा नवा मार्ग; नैसर्गिक निविष्ठांनी बदललं चित्र वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 15:14 IST

Natural Farming : वाशिम जिल्ह्यातील छोटंसं गाव गायवळ आज शाश्वत शेतीचं उदाहरण ठरतंय. डॉ. पंजाबराव देशमुख बायो इनपुट प्रशिक्षण केंद्र आणि गांडूळ खत प्रकल्पातून येथे तयार होणाऱ्या अल्पदरातील नैसर्गिक निविष्ठांनी शेकडो शेतकऱ्यांना आत्मनिर्भर केलं आहे. वाचा सविस्तर (Natural Farming)

Natural Farming :  वाशिम जिल्ह्यातील छोटंसं गाव गायवळ आज शाश्वत शेतीचं उदाहरण ठरतंय. डॉ. पंजाबराव देशमुख बायो इनपुट प्रशिक्षण केंद्र आणि गांडूळ खत प्रकल्पातून येथे तयार होणाऱ्या अल्पदरातील नैसर्गिक निविष्ठांनी शेकडो शेतकऱ्यांना आत्मनिर्भर केलं आहे. (Natural Farming)

अवघ्या दीड महिन्यात दीड लाखांहून अधिक विक्री करत गावाने शाश्वत शेतीकडे पाऊल टाकले आहे. शेती म्हणजे फक्त उत्पादन नव्हे, तर पर्यावरणाचे रक्षण आणि ग्रामीण विकासाची गुरुकिल्ली. ही संकल्पना साकारली आहे वाशिम जिल्ह्यातील गायवळ गावाने. (Natural Farming)

येथे सुरू असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख बायो इनपुट प्रशिक्षण केंद्र व गांडूळ खत निर्मिती प्रकल्पातून अल्पदरात शास्त्रशुद्ध नैसर्गिक निविष्ठा तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. (Natural Farming)

अवघ्या दीड महिन्यात सव्वादोन लाख रुपये किमतीच्या निविष्ठांची विक्री झाली असून, या उपक्रमाने शेकडो शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्यास प्रेरित केले आहे.(Natural Farming)

गावातील २० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संत गाडगेबाबा ऑरगॅनिक फार्म ग्रुपमार्फत हा प्रकल्प चालवला जातो. आत्मा, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र व राष्ट्रीय पातळीवरील संस्थांच्या मार्गदर्शनातून विविध प्रकारचे अर्क, खत, मायक्रोबायोलॉजिकल घटक यांची निर्मिती केली जाते. (Natural Farming)

यामध्ये दशपर्णी अर्क, जीवामृत, वीं वॉश, ट्रायकोडर्मा, गांडूळ खत, बायोडायनामिक कंपोस्ट, मायक्रोरायजा यांचा समावेश आहे.

गायवळ प्रकल्पाची विशेष बाब 'रोज पैसे देणारी शेती' साकारतेय

गायवळ प्रकल्पाची आणखी एक विशेष बाब म्हणजे 'रोज पैसे देणारी शेती' ही संकल्पना. शेतकरी रवींद्र गायकवाड यांनी या संकल्पनेतून महिलांना आणि तरुणांना वर्षभर रोजगार दिला आहे. 

सध्या प्रकल्पात २० देशी गायींचे संगोपन होत असून, त्यांच्यापासून मिळणारे गोमूत्र व शेण हेच प्रमुख कच्चा माल आहे. त्याचबरोबर बायोगॅस निर्मिती करून ऊर्जेचा वापरही इथं शेतात होतो.यामुळे उत्पादकता, गुणवत्ता आणि शाश्वत शेतीचा समतोल राखला जातो आहे.

प्रशिक्षण केंद्राला आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, कृषी विज्ञान केंद्र करडा व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील शास्त्रज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळत असल्याचे केंद्रप्रमुख भाग्यश्री गायकवाड यांनी सांगितले. 

केंद्रात तयार होणाऱ्या प्रमुख नैसर्गिक निविष्ठा

दशपर्णी अर्क, जीवामृत, बिजामृत, वर्मी वॉश, वर्मी कल्चर, ट्रायकोडर्मा, रायझोबियम, कोंबडी खत, गांडूळ खत, मायक्रोरायजा, एस-नाईन कल्चर, बायोडायनामिक कंपोस्ट. ही उत्पादने अल्पदरात मिळत असल्याने परिसरातील शेतकरी यांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.

शाश्वत शेतीसाठी नैसर्गिक मार्ग

गायवळच्या या उपक्रमातून स्पष्ट होतं की, नैसर्गिक शेती ही केवळ आरोग्यदायी अन्ननिर्मितीचा मार्ग नाही, तर रोजगारनिर्मिती, पर्यावरणसंवर्धन आणि आत्मनिर्भरतेकडे जाण्याचं एक उत्तम मॉडेल ठरू शकतं. आज या गावातील शेकडो शेतकरी नैसर्गिक निविष्ठांचा वापर करून उत्पादन वाढवत आहेत आणि जमिनीची सुपीकता सुधारत आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Banana Tissue Culture : नांदेडसह मराठवाड्यात केळी उत्पादनात दर्जा वाढणार; मिळणार 'टिश्यू कल्चर'ची साथ वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीसेंद्रिय शेतीवाशिम