Join us

Farmer Id Registration : नाशिक जिल्ह्यात 'हा' तालुका 'फार्मर आयडी' नोंदणीत आघाडीवर, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:22 IST

Farmer Id Registration : नाशिक जिल्ह्यात (Nashik District) १३ लाख ७८ हजार २३० शेतकऱ्यांच्या 'फार्मर आयडी' नोंदणीचे लक्ष आहे.

नाशिक : नाशिक जिल्ह्यात (Nashik District) १३ लाख ७८ हजार २३० शेतकऱ्यांच्या 'फार्मर आयडी' नोंदणीचे लक्ष आहे. मात्र, अॅग्रीस्टॅक संकेतस्थळाला सर्व्हर डाउनच्या (Server Down) फटक्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १२.१९ म्हणजे एक लाख ६७ हजार ९७७ शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी होऊ शकलेली आहे. नाशिकमध्ये सर्वांत कमी म्हणजे ७.१७, तर नांदगाव तालुक्यात तर सर्वांत जास्त म्हणजे २०.६० टक्के फार्मर आयडी नोंदणी झालेली आहे. 

येवला तालुक्यात आतापर्यंत ९२ हजार १२९ शेतकऱ्यांपैकी १७८३५ शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची नोंदणी (Farmer Id Registration) केली असून, प्रधानमंत्री किसान योजना, शेतकरी कर्ज वितरण सुलभता, पीकविमा योजना, पीक हमीभाव खरेदीसाठी मदत, किसान क्रेडिट कार्डअंतर्गत कर्ज वितरण, महाडीबीटीवरील कृषी विभागाच्या सर्व योजना, केंद्र व राज्य शासनाच्या कृषीबाबतच्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे. 

या योजनेला अॅग्रीस्टेंक असे नाव असून शेतकरी व त्यांच्या शेतजमिनीची ओळख पटविणे, शेतकऱ्याने पेरलेल्या पिकाचे नाव आणि क्षेत्र निश्चित करून त्या माहितीच्या माध्यमातून शेतकरी कर्ज वितरण सुलभता व कृषी योजनांची अंमलबजावणी करणे हेतू आहे. आधारकार्ड, आधार संलग्न मोबाइल, शेतकऱ्याचे सातबारा उतारे आवश्यक आहेत. ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक आपले सरकार सेवा केंद्र सेतू कार्यालय शेतकरी ओळखपत्र काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.

सातबारा उतारा असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आयडी मिळणार आहे. अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत सातबारा आधारला लिंक केल्यावर शेतकरी ओळखपत्र मिळेल,- आबा महाजन, तहसीलदार, दैवला

शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी सर्व्हर प्रॉब्लेम येत असून अनेक आधारकार्डला मोबाइल लिंक असूनही आधारकार्ड नंबर आणि अर्धवट फॉर्म राहून जातो.- संतोष खैरनार, सी.एस. सी. केंद्रचालक

टॅग्स :कृषी योजनाशेतीशेती क्षेत्रशेतकरी