Join us
Daily Top 2Weekly Top 5

नमो योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा, पैसे आले की नाही असे करा चेक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 19:35 IST

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आला आहे.

 Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आला आहे. या हप्त्यामुळे राज्यातील तब्बल ८९ लाख ७४ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

या हप्त्याअंतर्गत एकूण रु. १७,९८ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. यामुळे पारदर्शकता वाढून शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याविना त्वरित लाभ मिळत आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, शेती अधिक सक्षम करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांच्या प्रगतीसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवत आहे.

नमो योजना हप्ता स्टेटस चेक करण्याची प्रक्रिया : 

  • अधिकृत वेबसाइट : nsmny.mahait.org ला भेट द्या.
  • बेनिफिशिअरी स्टेटस : होमपेजवर 'Beneficiary Status' चा पर्याय निवडा.
  • तपशील भरा : तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा आधार नंबर एंटर करा.
  • कॅप्चा आणि ओटीपी : कॅप्चा कोड भरा, आवश्यक असल्यास मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) प्रविष्ट करा.
  • स्टेटस चेक : 'Submit' किंवा 'Get Data' वर क्लिक करा. तुमचा हप्ता जमा झाला आहे की नाही ते स्टेटसमध्ये दिसेल.
  • पर्यायी पद्धत : तुम्ही तुमच्या बँक खात्यात थेट मेसेज (SMS) चेक करून किंवा जवळच्या बँक शाखेत जाऊनही माहिती मिळवू शकता

 

 

 Gahu Market : कोणत्या गव्हाला चांगला दर मिळतोय, कुठून होतेय सर्वाधिक आवक, वाचा सविस्तर  

English
हिंदी सारांश
Web Title : Namo Yojana's 8th Installment Deposited: Check Your Bank Account Now!

Web Summary : The 8th installment of Namo Shetkari Yojana is deposited directly into farmers' accounts, benefiting 89.74 lakh farmers. Beneficiaries can check their status on nsmny.mahait.org using their registered mobile or Aadhaar number. The scheme aims to strengthen farmers and rural economies.
टॅग्स :कृषी योजनाशेती क्षेत्रशेतीशेतकरी