Join us

Namo Shetkari Hapta : पीएम किसानचे २ हजार आले, नमो शेतकरी सन्मान योजनेचे कधी? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 20:15 IST

Namo Shetkari Hapta : त्यानंतर नमो किसान शेतकरी सन्मान योजनेचा (Namo Kisan Installment) हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

Namo Shetkari Hapta : एकीकडे पीएम किसान योजनेचा (Pm Kisan Scheme) १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला. यावेळी शेतकऱ्यांनी नमो किसान शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळण्याची अपेक्षा बाळगली. मात्र यावेळी केवळ पी एम किसानचा (PM Kisan Yojana) हप्ता खात्यावर आला. त्यानंतर नमो किसान शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. 

त्यातच उद्या राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) मांडला जाणार आहे. यावेळी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत महत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळतात. यात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच ६ व्या हफ्त्यासोबत या निर्णयाची अंमलबजावणी होईल असे वाटते. याबाबत उद्या विधिमंडळ अधिवेशनातून समोर येईलच... 

पी एम किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी पीएम नरेंद्र मोदी PM Narendra Modi) यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. दुसरीकडे राज्यातील जवळपास 91 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. कारण यापूर्वी पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा हफ्ता एकत्रच मिळत होता. मात्र यावेळी तसं झाले नाही. 

एकीकडे विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि उद्या १० मार्च रोजी अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी विविध घोषणासह नमो सन्मान शेतकरी योजनेचा हफ्त्याची तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. शिवाय पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आले, मात्र नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे अद्याप आले नसल्याने शेतकरी प्रतीक्षेत आहेत. 

२ हजार रुपयांची प्रतीक्षा 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य सरकारकडून कृषी विभागाकडून ही योजना सुरु आहे. तेव्हापासून आतापर्यंत या योजनेचे ५ हफ्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. मागील महिन्यात बिहार राज्यातून पीएम नरेंद्र मोदी यांनी पीएम किसानच्या १९ व्या हफ्त्याचे वितरण करण्यात आले होते. त्यावेळीच नमो किसानचा हफ्ता १ किंवा २ मार्च पर्यंत मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र अद्यापही शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या २ हजाररुपयांची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाकृषी योजनाशेतीशेती क्षेत्र