Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mofat Til Biyane : शेतकऱ्यांनो, महाडीबीटीवर अर्ज करा अन् मोफत मिळवा उन्हाळी तीळ बियाणे वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 12:17 IST

Mofat Til Biyane : खाद्यतेलाची आयात कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उन्हाळी तीळ बियाणे पूर्णतः मोफत देण्याचा निर्णय घेतला असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकर अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Mofat Til Biyane)

Mofat Til Biyane : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया सन २०२५ अंतर्गत देशाला बियाणे उत्पादनात आत्मनिर्भर बनविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. (Mofat Til Biyane)

या अभियानाअंतर्गत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी तीळ पिकाचे प्रमाणित बियाणे १०० टक्के अनुदानावर (मोफत) उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.(Mofat Til Biyane)

देशात खाद्यतेलाची वाढती आयात कमी करणे तसेच देशी तेलबिया पिकांचा प्रसार करण्याच्या दृष्टीने ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत उन्हाळी तीळ पिकासाठी प्रतिहेक्टरी २.५ किलो प्रमाणित बियाणे (बाजारभाव सुमारे १९७ रुपये प्रति किलो) पूर्णतः मोफत वितरित करण्यात येणार आहे.(Mofat Til Biyane)

लाभाचे स्वरूप आणि अटी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. एका लाभार्थी शेतकऱ्याला किमान ०.२० हेक्टर ते कमाल १ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत बियाणे दिले जाईल. 

शासकीय पुरवठादारांकडे ५०० ग्रॅम किंवा १ किलो पॅकिंग उपलब्ध असून शेतकऱ्यांच्या लागवड क्षेत्रानुसार अनुज्ञेय बियाण्यापेक्षा पॅकिंग साईजमुळे जास्त बियाणे घ्यावे लागल्यास, त्या जास्तीच्या बियाण्याची रक्कम संबंधित शेतकऱ्याने स्वतः भरावी लागणार आहे.

जिल्ह्यास दिलेल्या उद्दिष्टाच्या अधीन राहून 'प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर लाभार्थी शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे.

अर्ज कसा करावा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी MahaDBT Farmer पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in वर जाऊन 'प्रमाणित बियाणे वितरण' या घटकाखाली अर्ज सादर करावा. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याची अॅग्रीस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक आहे.

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

उन्हाळी हंगामासाठी ही योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी असून वेळेत अर्ज न केल्यास या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ महाडीबीटी पोर्टलवर अर्ज दाखल करावा तसेच अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

वेळेत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांनाच बियाणे मिळणार असल्याने बी-बियाणांसाठी उशीर न करता अर्ज करणे अत्यावश्यक असल्याचेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Drone Sakhi : शेतीत ड्रोन युगाची सुरुवात; 'ड्रोन सखी'मुळे महिलांना मिळणार रोजगार वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Free Sesame Seeds: Apply on MahaDBT and Get Free Seeds!

Web Summary : Maharashtra farmers can get free sesame seeds under the National Food Oil Mission. Apply on MahaDBT portal for this 100% subsidized scheme. Limited applications, first-come, first-served.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकृषी योजना