Join us

MGNREGA Scheme : फुलंब्रीत पाणंद घोटाळा उघड; १० जणांवर कारवाईचा बडगा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 11:13 IST

MGNREGA Scheme : फुलंब्री तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत ५ कोटींचा मोठा घोटाळा उघड झाले आहे. एकाच मजुराचा फोटो अनेक कामांमध्ये वापरून सरकारी निधी उचलल्याचे चौकशीत समोर आले आहे. ७ रोजगार सेवक आणि ३ ऑपरेटर यांना दोषी ठरवले गेले असून त्यांच्यावर लवकरच फौजदारी कारवाई होणार आहे.(MGNREGA Scheme)

 रऊफ शेख

फुलंब्री रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील विविध गावांमध्ये मातोश्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत मंजूर केलेल्या कामांमध्ये ५ कोटी १८ लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी नियुक्त चौकशी समितीच्या अहवालात ७ रोजगार सेवक व ऑपरेटर दोषी आढळले आहेत. (MGNREGA Scheme) 

या दोषींवर प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिली. (MGNREGA Scheme) 

फुलंब्री तालुक्यातील ३३ गावांत रोजगार हमी योजनेंतर्गत पाणंद रस्त्यांची ११९ कामे सुरू आहेत. यातील काही कामे पूर्ण झाल्याचा अहवाल देऊन अकुशल कामाचे ५ कोटी १८ लाख रुपये उचलून त्याचा घोटाळा केल्याचे प्रकरण 'लोकमत'ने एका वृत्त प्रसिध्द केले होते. यात तब्बल ३३ गावांतील ९६ कामांमध्ये मजुरांचा काम करतानाचा एकच ग्रुप फोटो पुनः पुन्हा वापरण्यात आला होता.  (MGNREGA Scheme) 

तसेच महिला कामावर असताना पुरुषांचे फोटो वापरून पैसे उचलण्यात आले होते. याप्रकरणी नागपूर येथील रोहयो आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. (MGNREGA Scheme) 

त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवनकर यांची चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने काही दिवसांपूर्वीच आपला अहवाल अंकित यांना दिला. (MGNREGA Scheme) 

दोषींना शिक्षा होणारच या अनुषंगाने सीईओ अंकित यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, रोजगार हमी योजनेतील मातोश्री पाणंद रस्ते कामात प्रथम दर्शनी अहवालात ७ रोजगार सेवक, ऑपरेटर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. (MGNREGA Scheme) 

दोषींवर प्रशासकीय कारवाईबरोबरच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सरकारी निधीचा गैरवापर हा गंभीर प्रकार असून, दोषींना शिक्षा होणारच, असे ते म्हणाले. (MGNREGA Scheme) 

या अहवालात ७ रोजगार सेवक, ३ ऑपरेटर दोषी असल्याचे स्पष्ट झाले असले तरी रोजगार सेवक, ऑपरेटर व अभियंते यांचे संगनमत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे या कामांसाठी नियुक्त अभियंत्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.(MGNREGA Scheme) 

हे ही वाचा सविस्तर : MGNREGA Scheme: 'रोहयो'च्या कामांची तपासणी; आता बोगसगिरीला बसणार चाप

टॅग्स :शेती क्षेत्रसरकारी योजनाकृषी योजनाशेतकरीशेती