Join us

MGNREGA Scheme : ५ कोटींचा गैरव्यवहार? रोहयोच्या ९६ कामांची चौकशी सुरू वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:59 IST

MGNREGA Scheme : फुलंब्री तालुक्यात रोजगार हमी योजनेतून उभारण्यात आलेल्या 'मातोश्री पाणंद रस्ते' कामांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. एकाच ग्रुप फोटोचा वापर करून कोट्यवधींची बिले उचलल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. (MGNREGA Scheme)

रऊफ शेख  

फुलंब्री तालुक्यात रोजगार हमी योजनेतून उभारण्यात आलेल्या 'मातोश्री पाणंद रस्ते' कामांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. एकाच ग्रुप फोटोचा वापर करून कोट्यवधींची बिले उचलल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. (MGNREGA Scheme)

लोकमतच्या वृत्तानंतर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले असून ९६ कामांची सत्यता तपासली जात आहे.(MGNREGA Scheme)

फुलंब्री तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) करण्यात आलेल्या मातोश्री पाणंद रस्त्यांच्या कामांमध्ये गंभीर गैरप्रकार व अनियमितता झाल्याचे उघड झाल्यावर या वृत्ताची दखल नागपूरच्या रोजगार हमी विभागाच्या आयुक्तांनी घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.(MGNREGA Scheme)

काय आहे प्रकरण?

फुलंब्री तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या 'मातोश्री पाणंद रस्ते' योजनेच्या ३३ गावांतील ९६ कामांमध्ये मजुरांचा काम करतानाचा एकच ग्रुप फोटो पुन्हा पुन्हा वापरून ५ कोटी १८ लाख रुपयांची बिले उचलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. 

तसेच मातोश्री पाणंद रस्त्याच्या १३ कामांत महिला मजूर कामावर असताना पुरुष मजुरांचे काम करतानाचे ग्रुप फोटो वापरून लाखो रुपयांची बिले काढल्याचेही 'लोकमत'ने चव्हाट्यावर आणले होते. 

या वृत्तांची दखल नागपूर येथील रोहयो विभागाच्या आयुक्तांनी घेत छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.

९६ कामांच्या चौकशीचे आदेश

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार फुलंब्रीच्या तहसीलदार योगिता खटावकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले असून यामुळे या प्रकरणात तालुक्यातील २६ गावांतील ९६ कामे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. आता याबाबत अधिकृत चौकशीस सुरुवात झाल्याने संबंधित अधिकारी व ठेकेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा सविस्तर : MGNREGA Scheme : रोहयोच्या अनुदानाला केंद्राचा 'ब्रेक'; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरीशेती