Join us

Marathwada Crop Damage : शेतकऱ्यांना दिलासा! मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारची आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 10:40 IST

Marathwada Crop Damage : अतिवृष्टी आणि सलग पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून ते ऑगस्टदरम्यान लाखो हेक्टरवरील पिके हातची गेली असून, शासनाने १५०० कोटींच्या मदतपॅकेजपैकी ३०० कोटींचे वाटप सुरू केले आहे. सप्टेंबरमधील नुकसानीसाठीही नवीन पॅकेज जाहीर करण्यात आले असून, दिवाळीपूर्वी पंचनामे पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. (Marathwada Crop Damage)

Marathwada Crop Damage : मराठवाड्यात या वर्षीच्या मान्सूनमध्ये अतिवृष्टी आणि सलग पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत तब्बल ६ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके हातची गेली आहेत. (Marathwada Crop Damage)

तर, १ ते ३० सप्टेंबरदरम्यान २५ लाख ८६ हजार हेक्टरवरील पिकांचा चिखल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.(Marathwada Crop Damage)

राज्य सरकारने जून-ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीसाठी १५०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले, त्यापैकी ३०० कोटी रुपयांचे वाटप आजवर झाले आहे. (Marathwada Crop Damage)

तर सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या पॅकेजची घोषणा केली असून, त्याचा अध्यादेश ९ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे.(Marathwada Crop Damage)

नुकसानाचा आढावा (जून ते सप्टेंबर २०२५)

जिल्हाबाधित गावेबाधित शेतकरीएकूण नुकसान (हेक्टर)
संभाजीनगर५८७६,२३,१४९२,५६,६३४
परभणी४३३५,२२,५१०४,२३,०३२
हिंगोली१९०२४,८३,६५३३,५२,१४६
धाराशिव७३७१,०५,१२०५५,३७२
जालना३३१,२४,३४५५२,५६७
नांदेड८००७,७१,५२४६,४५,७५३
बीड१३२८४,१३,२२६२,३३,४३८
लातूर७२४४,०४,६५६२५,८६,८६९
एकूण३ कोटी ४४ लाखांहून अधिक शेतकरी प्रभावित२५ लाख ८६ हजार हेक्टरवर नुकसान

पंचनामे व भरपाईची प्रक्रिया

सप्टेंबरमधील नुकसानीचे ७९ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनामे दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट विभागीय प्रशासनाने ठेवले आहे.

मात्र, अनेक ठिकाणी हवामान बिघडल्याने आणि शासकीय कर्मचारी निवडणूक व इतर कामांमध्ये गुंतल्याने पंचनाम्यांना विलंब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिवाळीनंतर कार्यालये नियमित झाल्यानंतर शिल्लक प्रकरणे निपटवली जाणार आहेत.

ई-केवायसी संदर्भात सूचना

शासनाने जाहीर केले आहे की, 'ॲग्रीस्टॅक' (AgriStack) या प्रणालीत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाल्यास त्यांना थेट डीबीटीद्वारे मदत मिळेल. 'ॲग्रीस्टॅक'मधील नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना केवायसीमधून सूट असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.

दुष्काळी सवलती जाहीर; ५८ तालुके लाभार्थी

अतिवृष्टी आणि नंतरच्या दुष्काळी स्थितीचा विचार करून शासनाने मराठवाड्यातील ५८ तालुक्यांना दुष्काळी सवलती जाहीर केल्या आहेत.

या तालुक्यांचा समावेश 

छत्रपती संभाजीनगर : पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, फुलंबी, सोयगाव

धाराशिव : उमरगा, धाराशिव, लोहारा, भूम, परंडा, कळंब, वाशी, तुळजापूर

लातूर: देवणी, जळकोट, लातूर, रेणापूर, अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर, शिरूर-अनंतपाळ, चाकूर

परभणी: परभणी, जिंतूर, पालम, गंगाखेड, सेनू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा

हिंगोली: कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ

जालना: अंबड, जालना, घनसावंगी, बदनापूर, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद

बीड: बीड, शिरूर कासार, माजलगाव, गेवराई, धारूर, अंबाजोगाई, परळी, वडवणी, आष्टी, पाटोदा

शेतकऱ्यांना कोणत्या सवलती मिळणार

* जमीन महसूलात सूट

* कर्जाचे पुनर्गठन

* कर्जवसुलीस एक वर्षाची स्थगिती

* तिमाही वीजबिल माफ

* दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

* इतर शैक्षणिक फी माफ

शेतकऱ्यांसाठी सल्ला 

* पंचनामे सुरू असतील तर शेतकऱ्यांनी तपासणीवेळी उपस्थित राहावे आणि पिकांचे पुरावे सादर करावेत.

* 'ॲग्रीस्टॅक''मध्ये नोंदणी आणि ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.

* नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क ठेवावा.

* विमा दावा प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे : ७/१२ उतारा, आधार, बँक पासबुक तयार ठेवावीत.

हे ही वाचा सविस्तर : Crop Damage : दोन नाही, आता तीन हेक्टर नुकसानीची होणार नोंद; मदतीच्या यादीत नव्या शेतजमिनींचा समावेश

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada Farmers to Receive Financial Aid After Crop Damage

Web Summary : Marathwada farmers devastated by heavy rains will receive financial assistance. Government packages address June-September losses, with e-KYC simplifying direct aid disbursement. 58 drought-hit talukas also benefit from relief measures.
टॅग्स :शेती क्षेत्रपीकपीक विमापाऊसशेतकरीशेती