अमरावती : मेळघाटातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत प्रशासनाने मका खरेदीला अतिरिक्त १.५० लाख क्विंटलचे उद्दिष्ट मंजूर केले असून खरेदीची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. (Makka Kharedi)
मका खरेदी केंद्रे बंद झाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.(Makka Kharedi)
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ (Maharashtra State Cooperative Tribal Development Corporation) अंतर्गत मेळघाटातील चुर्णी येथील मका खरेदी केंद्रांवर खरेदी अचानक बंद करण्यात आली होती.
यामुळे शेतकऱ्यांचा मका शेतात व गोदामात पडून राहिला होता. बाजारात दर घसरल्याने शासन खरेदीवरच शेतकऱ्यांचा भर होता; मात्र खरेदी थांबल्याने आर्थिक संकट अधिक गडद झाले.
या पार्श्वभूमीवर मेळघाटातील शेतकरी आणि आदिवासी बांधवांनी थेट बच्चु कडू (Bachchu Kadu) यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
त्यानंतर कडू यांनी संबंधित विभागाचे मंत्री, सचिव, उपसचिव, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत मका खरेदी त्वरित सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
कडू यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करत अवघ्या एका दिवसात निर्णय घेतला. मेळघाटासाठी १.५० लाख क्विंटल अतिरिक्त मका खरेदीचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आणि खरेदीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली.
खरेदी केंद्रे पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती मिळताच शेतकरी व आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले.
यावर्षी मेळघाटात मक्याचे क्षेत्र उच्चांकी असून उत्पादनही समाधानकारक झाले आहे.
मात्र, खुल्या बाजारातील दर घसरल्याने शेतकऱ्यांना शासन खरेदीची गरज भासत होती.
वाढीव उद्दिष्ट आणि मुदतवाढीमुळे आता शेतकऱ्यांचा मका योग्य दरात विक्रीस जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, 'शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा सुरूच राहील,' असा इशारा बच्चू कडू यांनी प्रशासनाला दिला आहे.
हे ही वाचा सविस्तर : Makka kharedi : नोंदणी झाली, एसएमएस नाही; हजारो क्विंटल मका पडून वाचा सविस्तर
अधिक वाचा : Shetmal BajarBhav : तूर-हरभऱ्यात मंदी; साखर बाजारात नवा ट्विस्ट वाचा सविस्तर
Web Summary : Melghat farmers rejoice as administration approves 1.5 lakh quintals additional maize procurement with deadline extended to March 31. Bachchu Kadu's intervention ensured swift action after farmers faced difficulties due to procurement center closures and falling market rates.
Web Summary : मेळघाटातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! प्रशासनाने १.५० लाख क्विंटल अतिरिक्त मका खरेदीला मंजुरी दिली असून अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. मका खरेदी केंद्र बंद झाल्याने आणि बाजारात दर घसरल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांच्या मध्यस्थीने तातडीने कार्यवाही झाली.