- कुंदन पाटील जळगाव : आदिवासी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी एक मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे. राज्य शासनाने चोपडा तालुक्यातील 'भूमिपुत्र आदिवासी महिला अभिनव विकास फाऊंडेशन'ला महुची फुले आणि इतर फळांपासून प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
महुच्या फुलांपासून औषधी तयार करण्याची तयारी या गटाने सुरू केली आहे. त्यामुळे राज्यातील या पहिल्या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी महिलांच्या आर्थिक हातभार लागणार आहे.
हा प्रकल्प दररोज १०० लिटर मद्यार्क तयार करू शकणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तयार होणारे उत्पादन 'आदिवासी ब्रँड' म्हणून राज्यामध्ये नावारूपास येणार आहे. चुंचाळे व कृष्णापूर येथील आदिवासी महिलांच्या फाऊंडेशनला प्रकल्प उभारणीसाठी ३ वर्षाची मुदत दिली आहे. आदिवासी क्षेत्रातील व आदिवासी सदस्य असलेल्या वि.का. संस्था, महिला बचत गट, सहकारी संस्था व ग्रामपंचायतींकडून महूची फुले विकत घेऊन मद्यनिर्मिती केली जाणार आहे.
हातांना रोजगाराचा सुगंध !राज्यातील पहिल्याच प्रकल्पाला शासनाची मान्यताकुंदन पाटील लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : आदिवासी समाजाच्याआर्थिक उन्नतीसाठी एक मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे. राज्य शासनाने चोपडा तालुक्यातील 'भूमिपुत्र आदिवासी महिला अभिनव विकास फाऊंडेशन'ला महुची फुले आणि इतर फळांपासून मद्यनिर्मिती करण्याचा प्रकल्प सुरू करण्याची परवानगी दिली आहे. महुच्या फुलांपासून औषधी तयार करण्याची तयारी या गटाने सुरू केली आहे. त्यामुळे राज्यातील या पहिल्या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी महिलांच्या आर्थिक हातभार लागणार आहे.
हा प्रकल्प दररोज १०० लिटर मद्यार्क तयार करू शकणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तयार होणारे मद्य 'आदिवासी ब्रँड' म्हणून राज्यामध्ये नावारूपास येणार आहे. चुंचाळे व कृष्णापूर येथील आदिवासी महिलांच्या फाऊंडेशनला प्रकल्प उभारणीसाठी ३ वर्षांची मुदत दिली आहे. आदिवासी क्षेत्रातील व आदिवासी सदस्य असलेल्या वि.का. संस्था, महिला बचत गट, सहकारी संस्था व ग्रामपंचायतींकडून महूची फुले विकत घेऊन मद्यनिर्मिती केली जाणार आहे.
असे होणार फायदे
- वनसंपदा जपली जाणार
- आदिवासी घटकाच्या हातांना काम मिळणार
- महूच्या फुलांच्या विक्रीतून संबंधित संस्थांना उत्पन्न मिळणार
- वेकायदा मद्यविक्रीला चाप बसणार
महूच्या फुलांच्या प्रजाती.२००७ पासून मोहवृक्ष संशोधन, संवर्धन आणि मूल्यवर्धनात गुंतलेल्या बी. जी. महाजन यांनी स्वतःच्या १२ एकर शेतात महूच्या फुलांच्या ५ प्रजाती विकसित केल्या आहेत. त्यांच्या माध्यमातूनच या प्रकल्पाला चालना मिळाली आहे. 'आसवानी' प्रकल्पाची किनार या उत्पादनाला जुळणार आहे. १३० महिला सदस्यांच्या माध्यमातून फुलांपासून नैसर्गिक इथेनॉल, अल्कोहोल तयार केल्यानंतर त्याचा वापर आयुर्वेदिक औषधी निर्मितीसाठीही केला जाणार आहे असल्याचे महाजन यांनी सांगितले.
आदिवासी बांधवांच्या उन्नतीसाठी हा प्रकल्प अतिशय दिशादर्शक ठरणार आहे. आदिवासी महिलांची रोजगाराची वाट सुकर होणार आहे. त्यासोबत वनक्षेत्रातील प्रत्येक घटकासाठी राज्यातील हा पहिला प्रकल्प प्रेरणादायी ठरणार आहे.-आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.