MahaDBT Scheme : शेतकऱ्यांच्या शेतीतील उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या महा-डीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. (MahaDBT Scheme)
आतापर्यंत जिल्ह्यातील ६४ हजार ६१५ शेतकऱ्यांची निवड या योजनेत करण्यात आली असून, त्यापैकी ३ नोव्हेंबरपर्यंत तब्बल १ हजार १६७ लाभार्थी शेतकऱ्यांनी कृषी यंत्रे आणि अवजारे खरेदी केली आहेत. या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदानाचा लाभ लवकरच मिळणार आहे.(MahaDBT Scheme)
शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक यंत्रांचा लाभ
महा-डीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटोव्हेटर, पेरणीयंत्र, ट्रॉली, हार्वेस्टर, थ्रेशर आदी आधुनिक कृषी यंत्र खरेदीसाठी अनुदान दिले जाते. या योजनेत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज, कागदपत्र अपलोड आणि पूर्वसंमतीनंतरच खरेदी प्रक्रिया पूर्ण करता येते.(MahaDBT Scheme)
६४ हजार शेतकऱ्यांची निवड
जिल्ह्यातील दोन योजनांमधील लाभार्थींची संख्या खालीलप्रमाणे आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजना (५५,००९ शेतकरी)
अकोला – १०,३५०
अकोट – ७,०४०
बाळापूर – ८,२२९
बार्शीटाकळी – ७,६१०
मूर्तिजापूर – ९,३०५
पातूर – ५,९९३
तेल्हारा – ६,४८२
कृषी यांत्रिकीकरण उपयोजना (९,६०६ शेतकरी)
अकोला – १,८२९
अकोट – १,०७५
बाळापूर – १,६३६
बार्शीटाकळी – १,७१५
मूर्तिजापूर – १,२३७
पातूर – १,२७२
तेल्हारा – ८४२
७,६९० शेतकऱ्यांकडून कागदपत्रे अपलोड
३ नोव्हेंबरपर्यंत ७ हजार ६९० लाभार्थी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर दरपत्रक, चाचणी अहवाल आणि वितरक प्रमाणपत्रांसह आवश्यक कागदपत्रे अपलोड केली आहेत.
कृषी यांत्रिकीकरण योजना : ६,७८६ शेतकरी
कृषी यांत्रिकीकरण उपयोजना : २०४ शेतकरी
या टप्प्यानंतर कृषी विभागाकडून कागदपत्र पडताळणी आणि अनुदान मंजुरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
यांत्रिकीकरणातून शेतीत नफा
या योजनेचा उद्देश शेती अधिक उत्पादनक्षम, कमी मजुरीखर्चाची आणि वेळेत पूर्ण व्हावी हा आहे.
यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांना पेरणी, नांगरणी, कापणी आणि मळणी प्रक्रियेत वेळ व श्रमाची बचत होणार आहे.
निवड झालेल्या शेतकऱ्यांनी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करणे आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांची संमती घेणे अत्यावश्यक आहे. तसेच खरेदी केलेल्या यंत्रांची तपासणी अहवाल सादर केल्यास अनुदान जलद मंजूर होईल.
Web Summary : The MahaDBT scheme is gaining traction, empowering farmers with modern machinery. Over 64,000 farmers are selected. 1,167 have purchased equipment and will receive subsidies, enhancing productivity through mechanization.
Web Summary : महाडीबीटी योजना को मिल रही है गति, किसानों को आधुनिक मशीनरी से सशक्त बनाया जा रहा है। 64,000 से अधिक किसानों का चयन हुआ। 1,167 ने उपकरण खरीदे और उन्हें सब्सिडी मिलेगी, जिससे मशीनीकरण के माध्यम से उत्पादकता बढ़ेगी।