Mahadbt Portal : शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर व इतर अवजारांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांनी कागदपत्रे वेळेत अपलोड करणे गरजेचे आहे. परंतु, शेतकऱ्यांनी वेळेत कागदपत्रे अपलोड न केल्याने ते योजनेतून बाद होण्याचा धोका आहे.
विविध योजनांतर्गत निवड झालेल्या अर्जापैकी हजारो अर्ज केवळ 'शेतकरी कागदपत्रे अपलोड प्रलंबित' या गटामध्ये अडकले आहेत. राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, आरकेव्हीवाय आणि कृषी यांत्रिकीकरण लाभ उप-अभियान या तीन प्रमुख योजनांतर्गत घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले होते. मात्र, अर्ज मंजूर होऊनही कागदपत्रे वेळेत पोर्टलवर अपलोड करण्यात न आल्याने पुढील प्रक्रिया थांबली आहे.
वेळेत कागदपत्रे सादर न करणारे शेतकरी सिस्टिममधून बाद होण्याची शक्यता आहे. वेळेत कागदपत्रे आवश्यक लवकर 'महाडीबीटी' पोर्टलवर अपलोड करणे गरजेचे आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव न झाल्याने शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केली नाहीत. जे शेतकरी विहित मुदतीत कागदपत्रे अपलोड करणार नाहीत, त्यांचे अर्ज बाद होण्याचा धोका आहे.
पूर्वसंमतीसाठीही लागतेय वेळकेवळ कागदपत्रेच नाही, तर कागदपत्रे अपलोड झाल्यानंतरही तालुका कृषी अधिकारीस्तरावर स्क्रूटिनी (तपासणी) होण्यास विलंब होत आहे. ज्यांची सर्व प्रक्रिया होऊनही 'पूर्वसंमती' मिळणे बाकी आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेत निधीच्या कमतरतेमुळे पूर्व संमती देणे थांबले आहे, ज्यामुळे शेतकरी आणि कृषी अधिकारी हतबल झाले आहेत.
काय करावे लागते?महाडीबीटी पोर्टलवर अर्ज : शेतकरी पोर्टलवर अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करतात.पूर्व संमतीची प्रतीक्षा : अर्ज मंजूर झाल्यावर पूर्व संमती मिळते.अनुदान प्रक्रिया : पूर्व संमतीनंतर अनुदानाची पुढील प्रक्रिया सुरू होते. थोडक्यात, पूर्व संमती ही महाडीबीटी योजनेतील एक महत्त्वाची पायरी आहे, जी मंजुरी मिळाल्यावर शेतकऱ्याला अनुदान मिळवून देते, परंतु सध्या ती अनेक कारणांमुळे अडथळ्यांची ठरत आहे.
ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. त्या शेतकऱ्यांनी लवकर कागदपत्रे अपलोड करावी. त्यानंतर अवजारे खरेदीसाठी पूर्वसंमती प्राप्त करून घ्यावी.- प्रीती हिरळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
Web Summary : Farmers are urged to promptly upload documents to the Mahadbt portal for agricultural machinery schemes. Delays in pre-approval and document submission are causing application rejections due to funding shortages and bureaucratic delays. Officials emphasize timely action.
Web Summary : कृषि मशीनरी योजनाओं के लिए किसानों को महाडीबीटी पोर्टल पर तुरंत दस्तावेज़ अपलोड करने का आग्रह किया गया है। धन की कमी और नौकरशाही देरी के कारण पूर्व-अनुमोदन और दस्तावेज़ जमा करने में देरी से आवेदन अस्वीकार हो रहे हैं। अधिकारियों ने समय पर कार्रवाई पर जोर दिया।