Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2025, जानेवारी ते मार्च 2026 चा नुकसान मदत निधी आला, या जिल्ह्यांना मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 15:05 IST

Agriculture News : राज्यात विविध जिल्ह्यांत "अवकाळी पाऊस" यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत आली आहे.

Nuksan Bharpai : माहे ऑक्टोबर २०२५ ते नोव्हेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ ते मार्च २०२६ या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांत "अवकाळी पाऊस" यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता निश्चित केलेल्या दरानुसार रुपये ५३ कोटी ७३ लाख ७ हजार रूपये इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

दरम्यान DBT पोर्टलव्दारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरीत करण्यात यावा. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करुन संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरुन मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तथापि,

अ) चालू हंगामामध्ये यापूर्वी शेतीपिकांच्या नुकसानीकरिता वितरीत करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तांवातर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी.ब) कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देतांना व्दिरुक्ती होणार नाही याची तहसिलदार यांनी व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी.

हा निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सुचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी.

लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा. या आदेशाव्दारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाव्दारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करु नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील.

सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखे निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालये व महालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेवून एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील, अशी माहिती शासन निर्णयाद्वारे दिली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Funds Released for Crop Loss (Oct 2025-Mar 2026) in Several Districts

Web Summary : Maharashtra government approves ₹53.73 crore for farmers affected by unseasonal rains between October 2025 and March 2026. Funds will be directly transferred via DBT, ensuring no duplicate payments. District collectors oversee disbursement, preventing banks from diverting funds for loan recovery. Commissioners must provide expenditure reports.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपाऊस