Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > यंदाच्या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांसाठी 'या' मोठ्या घोषणा, कर्जमाफीविषयी मुख्यमंत्री काय म्हणाले?

यंदाच्या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांसाठी 'या' मोठ्या घोषणा, कर्जमाफीविषयी मुख्यमंत्री काय म्हणाले?

latest news Loan waiver up to Rs 2 lakh for farmers, the biggest announcement from the budget | यंदाच्या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांसाठी 'या' मोठ्या घोषणा, कर्जमाफीविषयी मुख्यमंत्री काय म्हणाले?

यंदाच्या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांसाठी 'या' मोठ्या घोषणा, कर्जमाफीविषयी मुख्यमंत्री काय म्हणाले?

Maharashtra Budget Live : या अर्थसंकल्पामधून राज्यातील शेतकऱ्यांसाठी काय काय घोषणा करण्यात आल्या, ते पाहुयात... 

Maharashtra Budget Live : या अर्थसंकल्पामधून राज्यातील शेतकऱ्यांसाठी काय काय घोषणा करण्यात आल्या, ते पाहुयात... 

Maharashtra Budget Live :   सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून या पार्श्वभूमीवर आज अर्थसंकल्प सादर केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पामधून राज्यातील शेतकऱ्यांसाठी काय काय घोषणा करण्यात आल्या, ते पाहुयात... 

  1. राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर.
  2. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीककर्ज थकित असलेल्या पात्र शेतकर्‍यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्ज परतफेड करणार्‍या पात्र शेतकर्‍यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदान
  3. कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ देण्यासोबतच बँकिंग यंत्रणा सक्षम करण्यासाठी, तसेच शेतकर्‍यांना कायमस्वरुपी कर्जमुक्त करण्यासाठी समितीच्या शिफारसींनुसार कार्यवाही करणार
  4. जून ते ऑक्टोबर २०२५ : शेतकर्‍यांना १५ हजार ४९२ कोटी रुपये वितरित
  5. शेतीमालाला जागतिक बाजारपेठ देण्यासाठी १० ते १५ पिकांची एकात्मिक मूल्यसाखळी निर्माण करणार
  6. अ‍ॅग्रीस्टॅक, महावेध, क्रॉपसॅप, महाडीबीटी, को. ऑप स्टॅक इत्यादी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकात्मिक इकोसिस्टीम उभारणार
  7. शेतीत एआयचा वापर. महाविस्तार एआय, वसुधा व्हॉईस टेलिफोनी, पुश टेलिफोनी, महाराष्ट्र अ‍ॅग्रीकल्चर डेटा एक्सचेंज, एआय सक्षम सँडबॉक्स इत्यादी उपक्रम सुरु
  8. आता चार कृषी विद्यापीठे एआय क्षमता आणि कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्स इनोव्हेशन अँड इन्क्युबेटर सेंटरची स्थापना करणार. उत्पादन खर्चात २५ टक्के घट होऊन उत्पादकता वाढीला चालना
  9. जानेवारी २०२६ पर्यंत १ कोटी ३१ लाख फार्मर्स आयडी तयार. आता त्यात आदिवासी वनपट्टेधारक शेतकरी समाविष्ट करणार
  10. कृषी समृद्धी योजना : २०२६-२७ पासून ४ वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवणार.
  11. नवीन प्राकृतिक शेती अभियान : ५ लाख हेक्टर क्षेत्र प्राकृतिक शेतीखाली आणणार
  12. नवीन मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना : राज्य आणि जिल्हा योजनांचे एकत्रिकरण करुन पशुधनात स्वयंपूर्णता, रोजगारनिर्मिती. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त गो-पालक, कुक्कुटपालक व शेळीपालक यांच्यासाठी विशेष कार्यक्रम
  13. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना : प्रतिवर्षी १२४० कोटी रुपये देणार, २० हजार ५९४ मासेमारांना लाभ
  14. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरुच राहणार, यंदा सुमारे २० हजार कोटींची तरतूद, फेब्रुवारी २०२६ पर्यंत ३२ हजार ७५६ कोटी रुपये दिले
  15. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० : १६ हजार मे.वॅ. ऊर्जाक्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट, यातून १०० टक्के कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा, डिसेंबर २०२६ पर्यंत १० हजार मे.वॅ. क्षमता स्थापित होणार, सध्या ३३४९ मे.वॅ. क्षमता स्थापित
  16. मागेल त्याला सौर कृषीपंप : आतापर्यंत ६ लाख ६३ हजार २२४ सौर कृषीपंप दिले, अंमलबजावणीत महाराष्ट्र नंबर एक 
  17. स्व. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा समावेश

 

 

Tur Market : तुरीच्या किंमती MSP च्या दिशेने, चालू मार्च महिन्यात सरासरी दर कसे राहतील, वाचा सविस्तर

 

Web Title : महाराष्ट्र बजट: किसानों का ऋण माफ, प्रमुख कृषि पहलें अनावरण।

Web Summary : महाराष्ट्र बजट में किसानों के लिए ₹2 लाख तक का ऋण माफी शामिल है, जिससे सितंबर 2025 तक बकाया ऋण वाले किसानों को लाभ होगा। नियमित ऋण चुकाने वालों को ₹50,000 का प्रोत्साहन मिलेगा। अन्य पहलों में दुर्घटना राहत योजना में कृषि मजदूरों को शामिल करना और प्राकृतिक खेती को बढ़ावा देना शामिल है।

Web Title : Maharashtra Budget: Farmer Loan Waiver Announced, Key Agricultural Initiatives Unveiled.

Web Summary : The Maharashtra budget includes a farmer loan waiver up to ₹2 lakh, benefiting farmers with overdue loans until September 2025. Regular loan payers will receive ₹50,000 incentive. Other initiatives include inclusion of farm laborers in accident relief scheme and promoting natural farming.