Join us

Ladki Bahin Yojana : प्रतीक्षा संपली, लाडकी बहिणींना निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 20:35 IST

Ladki Bahin Yojana : पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाल्याचे स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांसाठी महत्वाची बातमी आहे. आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाल्याचे स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे. 

लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हप्ते आतापर्यंतु या योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर आता योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबरच्या हफ्त्याची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा संपल्याचे सूतोवाच तटकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार याच महिन्यात सहावा हफ्ता मिळणार आहे. 

 

मंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या ट्विटनुसार पहिल्या टप्प्यात आधार सिंडीग राहिलेल्या सुमारे १२ लाख ८७ हजार ५०३ भगिनींना सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७ हजार ९२ हजार २९२ भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

या महिलांना देखील मिळणार आजपासून डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. यातही या योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांना बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे पैसे मिळण्यास अडचण आली होती. आता अशा महिलांना देखील पुढील चार ते पाच दिवसांत पैसे मिळणार आहेत, याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. 

टॅग्स :लाडकी बहीण योजनेचाकृषी योजनाशेती क्षेत्रशेती