Join us
Daily Top 2Weekly Top 5

Koradi Power Plant Agro Forest : महानिर्मितीचा मास्टरस्ट्रोक! वीज वसाहतीत फुलले ७,५०० फळझाडांचे 'ॲग्रो फॉरेस्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 12:38 IST

Koradi Power Plant Agro Forest : महानिर्मितीच्या कोराडी वीज केंद्राने केवळ वीज निर्मितीतच नाही, तर पर्यावरण रक्षण आणि महिला सक्षमीकरणातही एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आंबा, आवळा, फणस अशा फळझाडांनी नटलेले हे 'ॲग्रो फॉरेस्ट' नेमके कसे उभे राहिले? आणि पडीक जमिनीचा कायापालट करून बचत गटांना उत्पन्नाचे साधन कसे मिळाले? जाणून घेऊया या अनोख्या उपक्रमाची संपूर्ण माहिती (Koradi Power Plant Agro Forest)

दिनकर ठवळे

महानिर्मितीच्या कोराडी वीज केंद्राने पर्यावरणाचे रक्षण आणि महिला सक्षमीकरणाचा एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. वीज वसाहतीमधील पडीक जमिनीवर ७ हजार ५०० फळवृक्षांची लागवड करून एक भव्य 'ॲग्रो फॉरेस्ट' उभारण्यात आले असून, महानिर्मितीच्या इतिहासातील हा अशा प्रकारचा पहिलाच यशस्वी उपक्रम ठरला आहे.(Koradi Power Plant Agro Forest)  

पडीक जमिनीचा कायापालट

कोराडी वीज केंद्राने दोन वर्षांपूर्वी आयसीआयसीआय (ICICI) फाउंडेशनच्या मदतीने हा उपक्रम हाती घेतला होता. 

वसाहतीतील पडीक जागेचा वापर करून त्या ठिकाणी आंबा, आवळा, जांभूळ, बदाम आणि फणस अशा विविध प्रकारच्या ७ हजार ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. 

विशेष म्हणजे, लावलेल्या वृक्षांपैकी ९९ टक्के वृक्ष जगले असून आज त्यांची उंची ८ ते १० फुटांपर्यंत पोहोचली आहे.

आधुनिक सिंचन आणि सांडपाण्याचा वापर

या फळबागेला पाणी पुरवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे:

ड्रिप इरिगेशन : आयसीआयसीआय फाउंडेशनच्या मदतीने संपूर्ण बागेत ठिबक सिंचन प्रणाली बसवण्यात आली आहे.

पाण्याची सोय : महानिर्मितीने सहा ठिकाणी बोअरवेल केल्या असून, कोराडी वीज केंद्रातील एसटीपी (STP) प्रकल्पातील प्रक्रिया केलेले पाणी या वृक्षांना दिले जाते.

१२६ महिलांना हक्काचा रोजगार

या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा स्थानिक महिलांना झाला आहे. परिसरातील सहा बचत गटांकडे या वृक्षांच्या देखभालीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

रोजगार: एकूण १२६ महिला या ठिकाणी दररोज पाणी देणे, गवत काढणे आणि साफसफाईची कामे करतात.

मानधन: महानिर्मितीकडून प्रत्येक महिलेला दरमहा ५ हजार रुपये मानधन दिले जाते.

उत्पन्न: भविष्यात या फळांच्या विक्रीतून मिळणारा सर्व नफा संबंधित बचत गटांनाच विभागून दिला जाणार आहे.

पर्यावरण आणि सौंदर्याचा संगम

मुख्य अभियंता विलास मोटघरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. वीज वसाहतीचे पर्यावरणीय सौंदर्य वाढवणे, प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे आणि स्थानिकांना रोजगारासह फळे उपलब्ध करून देणे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

येत्या ३ ते ४ वर्षांत ही संपूर्ण वसाहत फळांनी बहरलेली पाहायला मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : Electricity Bill Problems : वीजबिल अचानक वाढलं? स्मार्ट मीटर नव्हे; 'हे' आहे खरे कारण

अधिक वाचा : HTBT Cotton Seeds : कापूस शेतकऱ्यांनो सावधान! HTBT बियाणे वापरले तर तुरुंगवास निश्चित?

English
हिंदी सारांश
Web Title : Koradi Plant's Agro Forest: Powering Environment and Empowering Women

Web Summary : Koradi power plant transformed barren land into a thriving agro forest with 7,500 fruit trees. This initiative provides employment for 126 local women, who manage the orchards using modern irrigation. The project aims to enhance the environment and provide sustainable income.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीजंगलमहिला