Join us

Kharif Crop Cultivation : पावसाचा वेळेवर दगा; खरीप पिकांमध्ये कपाशीचा दबदबा कायम वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 16:59 IST

Kharif Crop Cultivation : पावसाचा वेळेवर दगा मिळूनही मानोऱ्यात कपाशीचे साम्राज्य कायम आहे. खरिपातील पारंपरिक पिके घटली असली तरी कपाशीची लागवड तब्बल १३५ टक्क्यांवर गेली आहे. शेतकऱ्यांनी उशिरा पावसातही कपाशीवर विश्वास ठेवून नवा विक्रम नोंदवला आहे.(Kharif Crop Cultivation)

Kharif Crop Cultivation : मान्सूनच्या उशिरा सुरुवातीनंतरही मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा कपाशीच्या लागवडीवरच भर दिला आहे. (Kharif Crop Cultivation)

वेळेवर पाऊस न पडल्याने तूर, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी यांसारख्या पारंपरिक खरीप पिकांचे क्षेत्र घटले असले तरी कपाशीच्या लागवडीने नवा उच्चांक गाठला आहे.(Kharif Crop Cultivation)

पर्जन्यमान व पिकांची स्थिती

मानोरा तालुक्यात ९ सप्टेंबरपर्यंत ८३० मिमी पाऊस पडला आहे, जो हंगामातील सरासरी पर्जन्यमानाच्या ११६.४% आहे.

खरीप पिकांची एकूण पेरणी ५२ हजार ४१४ हेक्टर क्षेत्रावर झाली, जी सरासरी ५१ हजार ६३० हेक्टर पेक्षा जास्त आहे.

पारंपरिक पिकांच्या क्षेत्रात घट झाली; मात्र कपाशीचे क्षेत्र वाढून १७ हजार ७२ हेक्टर वर पोहोचले.

जिल्ह्यात कपाशीची निम्मी लागवड मानोऱ्यातच

वाशिम जिल्ह्यात या वर्षी कपाशीची लागवड अपेक्षित क्षेत्रापेक्षा मोठी वाढ झाली आहे.

जिल्ह्यात अपेक्षित क्षेत्र – २६ हजार ४३८ हेक्टर

प्रत्यक्ष लागवड – ३२ हजार १९४ हेक्टर

त्यातील जवळपास निम्मी लागवड केवळ मानोरा तालुक्यातच झाली आहे, म्हणजेच १३५.२३ टक्के इतकी वाढ झाली.

शेतकऱ्यांची धोरणात्मक पावले

जून अखेरीपर्यंत पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, उपलब्ध पाण्याच्या आधारे शेतकऱ्यांनी धाडस दाखवत कपाशीची लागवड केली. 

उशिरा पण चांगला पाऊस झाल्याने कपाशीच्या पिकाला बळ मिळाले, तर इतर पिकांवर मर्यादित क्षेत्रामुळे परिणाम झाला.

मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कपाशीवरील विश्वास पुन्हा एकदा दिसून आला. हवामानातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही कपाशी हा तालुक्याचा मुख्य आधार असल्याचे यंदाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.

हे ही वाचा सविस्तर : Kharif Crop Cultivation : अतिवृष्टीचा फटका, तरीही हळदीची लागवड शेतकऱ्यांचा आधार वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसशेतकरीशेतीवाशिम