Join us
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेल वाटपाचा कोटा ठरला, दर ठरले, आता वाटप लवकरच, वाचा कधीपर्यंत वाटप सुरु होईल? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 13:40 IST

Rokel Vatap : एकूणच, केरोसीन वितरणाचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अजूनही प्रतीक्षेत आहे.

Rokel Vatap :  एकीकडे गॅस टंचाईचा सामना अजूनही नागरिकांना करावा लागत आहे. दुसरीकडे गॅस टंचाईवर मात करण्यासाठी सरकारने रॉकेल वाटपाचा निर्णय घेतला आहे. शिवाय जिल्हानिहाय किती रॉकेल वाटप करायचे, लाभार्थ्यांना किती रुपयांनी रॉकेल वाटप करायचे, या सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर अजूनही रॉकेल वाटपाचा मुहूर्त ठरलेला नाही. 

इराण अमेरिका युद्धामुळे देशभरातच गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. युवा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा केरोसीन वाटपाचे आदेश दिले. जिल्हा निहाय रॉकेल वाटपाचा कोटा ठरला. तालुकानिहाय किती रॉकेल वाटप करायचे हे देखील ठरले. शिवाय कोणत्या तालुक्याने कुठल्या ठिकाणाहून रॉकेल उचलायचे आहे, हे देखील ठरले. मात्र प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी कितपत झाली आहे, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. 

गॅस सिलिंडर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यासाठी केरोसिनचा साठा मंजूर करण्यात आला होता. त्यानंतरच्या काळात गॅस सिलिंडरची उपलब्धता वाढल्यामुळे घरपोच सिलिंडर मिळू लागले आहेत. वेटिंगचे दिवसदेखील कमी झाल्याने टंचाईची तीव्रता कमी झाली.

तत्कालीन उपाययोजना म्हणून केरोसिनचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानंतर ना दुकानांमध्ये केरोसिन आले, ना ग्राहकांनी केरोसिनची विचारणा केली. केरोसिन प्राथमिकता नव्हती, हे दिसून आले असले तरी केरोसिन उपलब्ध झाले होते का? हा प्रश्न आहे.

केरोसिन गेले कुठे ?शासनाकडून केरोसिन मिळालेले नसले तरी ग्राहकांकडून अद्याप या पार्श्वभूमीवर विचारणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता केरोसिन जर दुकानातही नाही आणि ग्राहकही विचारत नसेल तर मग केरोसिन गेले कुठे?

अंमलजबजावणी कधी होणार?एकूणच, केरोसीन वितरणाचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अजूनही प्रतीक्षेत आहे. नागरिकांना केरोसीन कधी आणि कसे मिळणार, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेऊन तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे.

 

 ऑनलाईन लाईट बिल भरा, वीजबिलावर अतिरिक्त सवलत मिळवा, महावितरणकडून खास ऑफर

 

English
हिंदी सारांश
Web Title : Kerosene Distribution Approved, Rates Set, Distribution Soon: Details Inside

Web Summary : Despite approval and set rates, kerosene distribution faces delays amid gas cylinder availability. Nashik had stock approved, but demand waned. Implementation is awaited, urging prompt action for citizens.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीगॅस सिलेंडरएलपीजी गॅस टंचाई