Kapus Kharedi : यंदाच्या हंगामात पावसाने शेतकऱ्यांची मोठी वाताहत केली आहे. सोयाबीनचे उत्पादन घटले, तर कापसाची बोंडे सडली. (Kapus Kharedi)
आता कसाबसा कापूस वेचणीला आला असताना, शेतकरी तो मातीमोल भावाने व्यापाऱ्यांना विकण्यास भाग पाडले जात आहेत.(Kapus Kharedi)
दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्याने, त्यांनी व्यापाऱ्यांनी सांगितलेल्या दरात कापूस विकला. आता मात्र शेतकऱ्यांच्या नजरा भारतीय कापूस महामंडळाच्या (CCI) खरेदीकडे लागल्या आहेत.(Kapus Kharedi)
हमीभाव घोषित — पण खरेदी सुरू नाही
शासनाने यंदाच्या हंगामासाठी कापसाचा हमीभाव जाहीर केला असला, तरी सीसीआयची कापूस खरेदी केंद्रे अद्याप सुरू झालेली नाहीत. या विलंबाचा फायदा व्यापाऱ्यांनी उठवला आहे. शेतकऱ्यांकडून 'पडेल त्या भावात' कापूस खरेदी सुरू आहे.
सीसीआयने खरेदी सुरू केली नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांच्या दारातच कापूस विकावा लागतो. दरम्यान दिवाळीसाठी घरखर्च भागवण्यासाठी मातीमोल भावात माल विकला असल्याचे शेतकरी सांगतात.
पिकांची स्थिती आणि व्यापाऱ्यांचा फायदा
अकोट तालुक्यात सुमारे ४६ हजार ३०० हेक्टरवर कापसाचे १२ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीनचे, तर ६ हजार ६०० हेक्टरवर तुरीचे पीक घेण्यात आले आहे.
मात्र, सततच्या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले असून, व्यापाऱ्यांनी भाव ३ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आणले आहेत.
कापूस बाजारात दररोज भावात चढ-उतार सुरू आहेत. राज्य आणि देशातील इतर बाजारपेठांतील भाव पाहून व्यापारी स्थानिक बाजारात बोली लावत आहेत.
शासनाच्या हमीभावानुसार विक्री झाली तरी लागवडीचा खर्च निघत नाही. उलट तोटा सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांची मागणी
शासनाने तत्काळ सीसीआय खरेदी केंद्रे सुरू करून हमीभावाने कापूस खरेदी करावी.
विलंब झाल्यास व्यापाऱ्यांकडून सुरू असलेली लूट वाढत जाईल आणि बळीराजा आर्थिक संकटात सापडेल.
अकोट तालुक्यातील पिकांचा आढावा (हेक्टरमध्ये)
| पीक | क्षेत्रफळ (हेक्टर) |
|---|---|
| कापूस | ४६,३०० |
| सोयाबीन | १२,५०० |
| तूर | ६,६०० |
| मूग | १०० |
| उडीद | ५० |
| ज्वारी | ५० |
सोयाबीनलाही भावात घसरण; शेतकऱ्यांचा तोटा वाढतोय
सीसीआयने अद्याप खरेदी सुरू न केल्याने व्यापाऱ्यांचे सट्टेबाजार वाढले
शेतकरी सणासाठी कमी भावात कापूस विकायला मजबूर
