Join us

Kapus Kharedi : विदर्भात 'सीसीआय' मार्फत कापूस खरेदीसाठी केंद्रे निश्चित; जाणून घ्या सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 13:20 IST

Kapus Kharedi : भारतीय कापूस महामंडळाने (CCI) यंदाच्या हंगामासाठी कापूस खरेदीची तयारी पूर्ण केली आहे. वाशिम जिल्ह्यात मानोरा, कारंजा, वाशिम आणि मंगरूळपीर या चार केंद्रांतून खरेदी होणार असून, १ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी केंद्र सरकारने 'कापूस किसान' हे विशेष मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. (Kapus Kharedi)

Kapus Kharedi : भारतीय कापूस महामंडळाने (CCI) यंदाही हमीभाव योजनेंतर्गत कापूस खरेदीची तयारी केली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील मानोरा, कारंजा, वाशिम आणि मंगरूळपीर या चार खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी करण्यात येणार आहे. (Kapus Kharedi)

यासाठी १ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणीला प्रारंभ होणार असून शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करणे बंधनकारक आहे. (Kapus Kharedi)

'कापूस किसान' मोबाइल ॲपद्वारे नोंदणी

कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना स्व-आधार आधारित पूर्वनोंदणी करण्याची सुविधा यंदाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी केंद्र सरकारने 'कापूस किसान' (Kapas Kisan) हे खास मोबाइल ॲप विकसित केले आहे.

हे ॲप ३० ऑगस्ट २०२५ पासून उपलब्ध होणार आहे.

ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल आयओएस स्टोअरवरून डाउनलोड करता येईल.

या ॲपवर नोंदणी न केल्यास सीसीआय शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करणार नाही.

नोंदणी झाल्यानंतर, शेतकऱ्यांची माहिती राज्य शासनाच्या प्राधिकरणाद्वारे तपासली जाईल आणि त्यानंतरच मंजुरी दिली जाईल. प्राधिकरणासाठी स्वतंत्र लॉगिन आयडी देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे.

गर्दी टाळण्यासाठी स्लॉट बुकिंग

खरेदी केंद्रावर होणारी गर्दी व लांबलचक रांगा टाळण्यासाठी, सीसीआयने शेतकऱ्यांना 'स्लॉट बुकिंग' सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

शेतकरी ७ दिवसांच्या रोलिंग आधारावर स्लॉट बुक करू शकतील.

स्लॉट उपलब्धतेनुसार शेतकरी आपल्या पसंतीची विक्री तारीख निवडू शकतील.

विदर्भात सीसीआयची ६७ खरेदी केंद्रे

यंदा सीसीआयच्या वतीने विदर्भातील एकूण ६७ केंद्रांवर कापूस खरेदी केली जाणार आहे.

अकोला जिल्हा : ६ केंद्रे

अमरावती जिल्हा : १० केंद्रे

बुलढाणा जिल्हा : ७ केंद्रे

वाशिम जिल्हा : ४ केंद्रे

यवतमाळ जिल्हा : १५ केंद्रे

याशिवाय, इतर जिल्ह्यांतील केंद्रांवरही शेतकऱ्यांना हमीभावाने कापूस विक्रीची संधी मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला

* वेळेत ऑनलाइन नोंदणी करा, अन्यथा खरेदी केंद्रावर कापूस विक्री करता येणार नाही.

* 'कापूस किसान' ॲप डाउनलोड करून आवश्यक माहिती अपलोड करा.

* केंद्रावर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी स्लॉट बुकिंग करूनच जा.

* कापूस विक्रीपूर्वी कापसाची स्वच्छता व कोरडेपणा याकडे लक्ष द्या.

हे ही वाचा सविस्तर : CCI Cotton Farmers App : सीसीआयचे 'कापस किसान' ॲप; शेतकऱ्यांसाठी कापसाची ऑनलाइन नोंदणी सुरू

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारविदर्भमार्केट यार्डमार्केट यार्ड