Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Kapus Kharedi : सीसीआय खरेदीला वेग; राज्यात कापसाची मोठी आवक वाचा सविस्तर

Kapus Kharedi : सीसीआय खरेदीला वेग; राज्यात कापसाची मोठी आवक वाचा सविस्तर

latest news Kapus Kharedi: CCI accelerates procurement; Large arrival of cotton in the state Read in detail | Kapus Kharedi : सीसीआय खरेदीला वेग; राज्यात कापसाची मोठी आवक वाचा सविस्तर

Kapus Kharedi : सीसीआय खरेदीला वेग; राज्यात कापसाची मोठी आवक वाचा सविस्तर

Kapus Kharedi : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायी घडामोड समोर आली आहे. भारतीय कापूस महामंडळाच्या (CCI) खरेदी केंद्रांवर आवक दिवसेंदिवस वाढत असून, हमीभावाने खरेदीला चांगला वेग मिळत आहे. (Kapus Kharedi)

Kapus Kharedi : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायी घडामोड समोर आली आहे. भारतीय कापूस महामंडळाच्या (CCI) खरेदी केंद्रांवर आवक दिवसेंदिवस वाढत असून, हमीभावाने खरेदीला चांगला वेग मिळत आहे. (Kapus Kharedi)

Kapus Kharedi : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायी बातमी आहे. 'सीसीआय'च्या खरेदी केंद्रांवर कापसाची आवक झपाट्याने वाढली आहे.(Kapus Kharedi) 

२४ नोव्हेंबरपर्यंत तब्बल १.४० लाख क्विंटल कापूस हमीभावाने खरेदी झाला असून सहा लाख क्विंटलपेक्षा जास्त कापूस तपासणीसाठी केंद्रांवर पोहोचला आहे. पारदर्शक तपासणी, अचूक आर्द्रता मापन आणि जलद देयकामुळे शेतकऱ्यांचा कल सीसीआयकडे वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.(Kapus Kharedi) 

१६९ खरेदी केंद्रांवर जोरदार प्रतिसाद

राज्यात शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी १६९ सीसीआय खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. देशभरातही ५७० हून अधिक केंद्रांवर खरेदी सुरू असून महाराष्ट्रातील केंद्रांवर सतत वाढणारी कापसाची आवक यंदाच्या हंगामात उत्पादन चांगले असल्याचे चित्र स्पष्ट करते.

खरेदीचे मोठे लक्ष्य : दोन कोटी क्विंटलचा अंदाज

सीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी देशात सुमारे आठ कोटी क्विंटल कापूस खरेदी होण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रात दोन कोटी क्विंटलपेक्षा जास्त खरेदीची शक्यता व्यक्त केली आहे.

खरीप हंगामात यंदा राज्यात तब्बल ३८.४० लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली असून आवक वाढण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.

शेतकऱ्यांचा 'सीसीआय'वर वाढता विश्वास

सीसीआय केंद्रांवरील तपासणी प्रक्रियेतील पारदर्शकता, आर्द्रता मापनातील अचूकता, वजन प्रक्रियेचे स्पष्ट नियम आणि देयकाची जलद अदा या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांचा कल सीसीआयकडे आणखी वाढला आहे. कापूस विक्रीत वाढ होत असून शेतकरी मोठ्या प्रमाणात सरळ सीसीआयकडे माल विकण्यास प्राधान्य देत आहेत.

ऑनलाइन नोंदणीला प्रतिसाद

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सीसीआय (CCI) ने किसान ॲपद्वारे ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध केली आहे. खरेदी केंद्रावर येण्यापूर्वी नोंदणी करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली असून, आता अधिक शेतकरी या सुविधेचा लाभ घेत आहेत.

राज्यातील कापूस आवक आणि खरेदीतील वाढ शेतकऱ्यांसाठी सकारात्मक ठरत आहे. पारदर्शक प्रक्रियेमुळे सीसीआयवर वाढता विश्वास, स्थिर खरेदी व्यवस्थापन आणि जलद देयकामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा खरीखुरा लाभ मिळत आहे. आगामी काही दिवसांत खरेदीला आणखी गती मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Soybean Kharedi : सोयाबीनला 'रेड सिग्नल'! आर्द्रता वाढली, रंगबदलाने खरेदी अडचणीत वाचा सविस्तर

Web Title : महाराष्ट्र में सीसीआई के साथ कपास खरीद में तेजी; आवक बढ़ी

Web Summary : भारतीय कपास निगम (सीसीआई) ने महाराष्ट्र में कपास खरीद तेज की। 1.4 लाख क्विंटल खरीदा गया, छह लाख प्रसंस्करण का इंतजार कर रहे हैं। पारदर्शिता और शीघ्र भुगतान के कारण 169 केंद्रों पर किसान सीसीआई को पसंद करते हैं।

Web Title : Cotton Procurement Gains Momentum with CCI in Maharashtra; Arrivals Increase

Web Summary : Cotton Corporation of India (CCI) speeds up cotton purchase in Maharashtra. 1.4 lakh quintals purchased, with six lakh awaiting processing. Farmers prefer CCI due to transparency and prompt payments across 169 centers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.