Kanda Anudan : केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांसाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला आहे. योजनांचे अनुदान जर यायचे असल्यास त्यासाठी फार्मर आयडी असणे आवश्यक झाले आहे. नुकताच कांदा अनुदान मंजूर झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले आहे. त्याच पात्र शेतकऱ्यांना थकीत अनुदान वितरित करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांकडून थकीत अनुदान मंजुरीसाठी शासनावर दबाव वाढला होता. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीनुसार अनुदान मंजुरीसाठीचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी करण्यात आली. शेतकऱ्यांना थकीत अनुदान ऑनलाइन पद्धतीने थेट बँक खात्यावर मिळेल. मात्र यासाठी फार्मर आयडी आवश्यक असणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील ३० टक्के शेतकऱ्यांनी दोनवेळेस मुदत वाढवून देखील फार्मर आयडी काढले नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचा वेळ आता फार्मर आयडी काढण्यात जाईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून कृषीविषयक योजनांचा लाभ घ्याया, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्हानिहाय मंजूर अनुदान असे
नाशिक जिल्हा पात्र शेतकरी - ९ हजार ९८८अनुदान मंजूर - १८ कोटी ५८ लाख ७८ हजार ४९३ रुपये
धाराशिव जिल्हा पात्र शेतकरी - २७२अनुदान मंजूर - १ कोटी २० लाख ९८ हजार ७०५ रुपये
पुणे ग्रामीण पात्र शेतकरी - २७७अनुदान मंजूर - ७८ लाख २४ हजार ३३० रुपये
सांगली जिल्हा पात्र शेतकरी - २२अनुदान मंजूर - ८ लाख ०७ हजार २७८ रुपये
सातारा जिल्हा पात्र शेतकरी - २००२अनुदान मंजूर - ३ कोटी ३ लाख ८६ हजार ६०८ रुपये
धुळे जिल्हा पात्र शेतकरी - ४३अनुदान मंजूर - ५ लाख ७१ हजार ६०९ रुपये
जळगाव जिल्हा पात्र शेतकरी - ३८७१ कोटी ६ लाख ४७ हजार ९७६ रुपये
अ.नगर जिल्हा पात्र शेतकरी - १४०७अनुदान मंजूर - २ कोटी ८१ लाख १२ हजार ९७९ रुपये
नागपूर जिल्हा पात्र शेतकरी - ०२अनुदान मंजूर - २६ हजार ८०० रुपये
रायगड जिल्हा पात्र शेतकरी - २६१अनुदान मंजूर - ६८ हजार ७६ हजार २६ रुपये
- राज्यातील एकूण शेतकरी - १४ हजार ६६१
- मंजूर अनुदान - २८ कोटी ३२ लाख ३० हजार ५०७