Lokmat Agro >शेतशिवार > Jwari Kharedi : ज्वारी खरेदीची मुदत संपली; शेतकऱ्यांची क्विंटलनं ज्वारी गाड्यांत अडकली

Jwari Kharedi : ज्वारी खरेदीची मुदत संपली; शेतकऱ्यांची क्विंटलनं ज्वारी गाड्यांत अडकली

latest news Jwari Kharedi: The deadline for Jwari Kharedi has expired; Farmers' quintals of sorghum are stuck in vehicles | Jwari Kharedi : ज्वारी खरेदीची मुदत संपली; शेतकऱ्यांची क्विंटलनं ज्वारी गाड्यांत अडकली

Jwari Kharedi : ज्वारी खरेदीची मुदत संपली; शेतकऱ्यांची क्विंटलनं ज्वारी गाड्यांत अडकली

Jwari Kharedi : ३१ जुलै रोजी शासकीय ज्वारी खरेदीची मुदत संपली आणि शेकडो क्विंटल शेतमालासोबत शेतकऱ्यांची आशाही गडप झाली. तांत्रिक अडथळ्यांमुळे वेळेवर खरेदी न झाल्याने मालगाड्या गोडावूनबाहेर थांबलेल्या आहेत आणि शेतकरी दररोजचा भाड्याचा बोजा सहन करत आहेत. आता यंत्रणेकडे एकच मागणी करत आहेत 'मुदतवाढ द्या, माल वाचा'. (Jwari Kharedi)

Jwari Kharedi : ३१ जुलै रोजी शासकीय ज्वारी खरेदीची मुदत संपली आणि शेकडो क्विंटल शेतमालासोबत शेतकऱ्यांची आशाही गडप झाली. तांत्रिक अडथळ्यांमुळे वेळेवर खरेदी न झाल्याने मालगाड्या गोडावूनबाहेर थांबलेल्या आहेत आणि शेतकरी दररोजचा भाड्याचा बोजा सहन करत आहेत. आता यंत्रणेकडे एकच मागणी करत आहेत 'मुदतवाढ द्या, माल वाचा'. (Jwari Kharedi)

शेअर :

Join us
Join usNext

Jwari Kharedi : ३१ जुलै रोजी शासकीय ज्वारी खरेदीची मुदत संपली आणि शेकडो क्विंटल शेतमालासोबत शेतकऱ्यांची आशाही गडप झाली. तांत्रिक अडथळ्यांमुळे वेळेवर खरेदी न झाल्याने मालगाड्या गोडावूनबाहेर थांबलेल्या आहेत आणि शेतकरी दररोजचा भाड्याचा बोजा सहन करत आहेत. (Jwari Kharedi)

आता यंत्रणेकडे एकच मागणी करत आहेत 'मुदतवाढ द्या, माल वाचा'. (Jwari Kharedi)

शासकीय ज्वारी खरेदीची मुदत संपली. सोबतच शासनाकडून देण्यात आलेले ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने ज्या शेतकऱ्यांचा माल विकला गेला नाही, त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. (Jwari Kharedi)

शेकडो क्विंटल ज्वारी भरून असलेल्या शेतकऱ्यांनी भाड्याने ठरविलेल्या मालगाड्या शासकीय गोडावून बाहेर खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. तिवसा खरेदी विक्री समिती अंतर्गत शासकीय ज्वारी खरेदीच्या कालावधीत कधी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेले पोर्टल, तर कधी ओटीपीच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्याला विनासायास शासकीय खरेदी केंद्रावर आपला माल विकता आला नाही. (Jwari Kharedi)

आता खरेदी केंद्राचे दरवाजे बंद झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत आला आहे. शासनाने मुदतवाढ देऊन ज्वारी खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.

सहा दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मालगाड्या शासकीय गोडावूनबाहेर, प्रतीक्षा संपता संपेना. शासनाने ठरवून दिलेली मुदत व उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. मुदतवाढ मिळाल्यास शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात येईल. - डॉ. मयूर कळसे,  तहसीलदार, तिवसा

यापूर्वी दोनदा मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता, पुन्हा उद्दिष्ट व मुदतवाढ प्रस्ताव पाठविला. - दीपक गोफणे, व्यवस्थापक, खरेदी विक्री समिती, तिवसा.

गेल्या सहा दिवसांपासून भाड्याची गाडी घेऊन ५० क्विंटल ज्वारी विक्रीसाठी आणली आहे. दैनंदिन हजार रुपये गाडी भाड्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. - प्रवीण होले, शेतकरी, शिवणगाव

हे ही वाचा सविस्तर : Jowar Kharedi : शेतकऱ्यांना हमी दराचा थेट लाभ; ज्वारी विक्रीने विक्रमी कमाई वाचा सविस्तर

Web Title: latest news Jwari Kharedi: The deadline for Jwari Kharedi has expired; Farmers' quintals of sorghum are stuck in vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.