Join us
Daily Top 2Weekly Top 5

John Deere Tractor : जॉन डीयरचा नवा हायपॉवर ट्रॅक्टर आला, पुण्यात होतेय निर्मिती, काय आहेत वैशिष्टये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 17:35 IST

John Deere Tractor : जॉन डीयर या ट्रॅक्टर कंपनीने उच्चशक्तीचा ट्रॅक्टर लाँच केला असून तो शेतीच्या कामासाठी उपयोगात आणलाा जाणार आहे.

Pune : कृषी क्षेत्रात दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञानाचा अविष्कार होत असून आता भारतीय शेती सोपी होत चालली आहे. खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून अनेक मशीनरी आणि तंत्रज्ञानाचा विकास होत असून त्याचा फायदा शेतीसाठी होताना दिसत आहे.

त्यातच जॉन डीयर या ट्रॅक्टर कंपनीने उच्चशक्तीचा ट्रॅक्टर लाँच केला असून तो शेतीच्या कामासाठी उपयोगात आणलाा जाणार आहे. विशेष म्हणजे हा ट्रॅक्टर स्वदेशी बनावटीचा असून तो जगभर निर्यात केला जाणार आहे. 

जॉन डीयरने ६५ लाख रूपये किंमतीचा व १३० अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरचे ११ मार्च रोजी पुण्यातील सणसवाडी येथे असलेल्या कारखान्यात अनावरण केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार सिन्हा, मुकुल वाष्णेर्य, रमाकांत गर्ग हे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना जॉन डीयर इंडियाचे एमडी व कंट्री मॅनेजर आणि सीॲण्डएफ वर्ल्‍डवाइडच्‍या अध्‍यक्षांचे धोरणात्‍मक सल्‍लागार राजेश सिन्‍हा म्‍हणाले, ''जॉन डीयरच्‍या धोरणामधील प्रमुख बाब म्‍हणजे, स्‍मार्ट कनेक्‍टेड मशिन्‍ससाठी अचूक कृषी व डिजिटल उपाययोजनांचे एकीकरण, ज्‍यामुळे शेतकरी कमी संसाधनांमध्‍ये देखील अधिकाधिक उत्‍पादन करण्‍यास सक्षम होतात. 

नुकतेच लाँच करण्‍यात आलेले तंत्रज्ञान शेतीमधील कामे व उत्‍पादन खर्च कमी करण्‍यासाठी, जमिन व पर्यावरण स्थिरतेची खात्री घेणाऱ्या अचूक पीक संरक्षण उपाययोजना तयार करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत.

'' संशोधन व विकास, अभियांत्रिकी, जागतिक आयटी, पुरवठा यंत्रणा, रस्ते बांधकाम, उत्पादन आणि कौशल्य या क्षेत्रांतील जॉन डीयरची भारतातील उपस्थिती जगभरातील कार्यसंचालनांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, असे सिन्‍हा पुढे म्‍हणाले. 

भारतातील सेल्‍स अँड मार्केटिंगचे डायरेक्‍टर रमाकांत गर्ग म्‍हणाले, "प्रगत कृषी तंत्रज्ञान आणि विकसित होत असलेल्‍या कृषी पद्धती एकमेकांशी पूरक आहेत. जॉन डीयर भावी कृषी पद्धतींसाठी यामध्‍ये संतुलन राखण्‍याप्रती कटिबद्ध आहे. पॉवर अँड टेक्‍नॉलॉजी ७.० हे त्‍याच दिशेने पाऊल आहे.

गतकाळापासून जॉन डीयर भारतातील बाजारपेठांसाठी तंत्रज्ञानदृष्‍ट्या उच्‍च दर्जाची उत्‍पादने सादर करण्‍यामध्‍ये आघाडीवर आहे आणि आम्‍हाला आजच्‍या तंत्रज्ञान इव्‍हेण्‍टमध्‍ये ही परंपरा कायम राखताना अभिमान वाटतो."

ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

  • -५१३०एम (१३० एचपी) ट्रॅक्‍टरवर फ्रण्‍ट हिच व फ्रण्‍ट पीटीओ अॅप्‍लीकेशन 
  • -५ई ऑटोट्रॅक (स्‍ट्रेट-रो वेईकल गाइडन्‍स सिस्‍टम) 
  • -ग्रीनसिस्‍टम लिंक - फॅक्‍टरी-फिटेड किट - कनेक्‍टीव्हीटी सोल्‍यूशन 
  • -५४०५ आणि ५०७५ई रेडियल टायर्स (१००%)
English
हिंदी सारांश
Web Title : John Deere Launches High-Power Tractor, Made in Pune, Exports Globally

Web Summary : John Deere launched a 130 HP tractor in Pune, priced at ₹65 lakh. This 'Made in India' tractor is designed for global export and features advanced technology for efficient farming and reduced production costs. It includes features like front hitch, auto-track, and radial tires.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपुणेशेती