Agriculture News : जर तुमच्या जमिनीवरून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता तयार करण्यात आला असेल. तर ती जमीन सरकारी वापरासाठी राखीव समजली जाते. तुम्ही त्या भागावर बांधकाम, भिंत, गेट, शेती इ. काही करू शकत नाही.
जर रोड बिनअधिकृतरीत्या टाकला असेल, तर तुम्ही संबंधित विभागाकडे तक्रार करू शकता, किंवा जमिनीचा मोबदला मागू शकता.
संबंधित कायदा काय सांगतो?
तर Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013. नुसार जमिनीवरून नाला / गटार जात असेल तर : नैसर्गिक नाले सरकारच्या मालकीचे समजले जातात. अशा नाल्याचा प्रवाह अडवणे, भराव टाकणे, किंवा बदल करणे हा गुन्हा ठरतो. महसूल अधिकारी किंवा ग्रामसेवक अशा प्रकरणात कारवाई करू शकतात.
नियम काय आहेत? Maharashtra Irrigation Act, 1976 आणि Environment Protection Rules.नुसार वीजलाइन (Electric Line) असल्यास : तुमच्या जमिनीवरून हाय टेन्शन लाइन, ट्रान्सफॉर्मर, किंवा इलेक्ट्रिक पोल गेल्यास तुम्ही त्या खाली बांधकाम किंवा झाडे लावू शकत नाही. ती जागा "Right of Way" (मार्गाधिकार) म्हणून वीज विभागाला दिलेली असते. जर नवीन लाइन टाकायची असेल तर विभाग तुमची पूर्व परवानगी घेतो, परंतु जमीन संपादन न करता फक्त वापराचा हक्क घेतो.
भरपाई मिळू शकते का?हो, जर सरकार किंवा वीज विभागाने तुमची जमीन अधिग्रहण केली असेल तर मोबदला मिळतो. पण जर फक्त वापराचा हक्क (जसे की वीज लाइन टाकणे) घेतला असेल, तर बहुतांश वेळा एकदाच ठराविक नुकसानभरपाई मिळते.
काय करावे जर तुमच्या जमिनीवर असे काही असेल तर?
- सर्वात प्रथम सातबारा उतारा आणि फेरफार तपासून घ्या. त्या भागावर कोणते आरक्षण दाखवले आहे का?
- ग्रामपंचायत /तालुका कार्यालय / PWD / MSEDCL कडे अर्ज करून तपासणी मागा.
- जर अनधिकृत वापर झाला असेल तर तक्रार महसूल अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे करा.
- आवश्यक असल्यास RTI (माहिती अधिकार) वापरून कागदपत्रे मिळवा.
- गाव नकाशा / भूअभिलेख कार्यालयातून प्रत काढा.
वीजलाइन टाकताना तुमचं पिक, झाडं किंवा बांधकाम जर नुकसान झालं असेल, तर तुम्हाला नुकसानभरपाई मिळण्याचा हक्क आहे. MSEDCL किंवा महावितरण विभागाकडे यासाठी अर्ज पंचनामा अहवाल सादर करावा लागतो. काही प्रकरणांमध्ये एकदाच मोबदला दिला जातो.
Web Summary : Roads or power lines on your land? Know your rights! Compensation is possible if land is acquired; otherwise, a one-time settlement is typical. Check records, apply to relevant authorities, and claim damages for losses.
Web Summary : क्या आपकी जमीन पर सड़क या बिजली की लाइन है? अपने अधिकार जानें! भूमि अधिग्रहण पर मुआवजा संभव है; अन्यथा, एकमुश्त निपटान सामान्य है। रिकॉर्ड जांचें, संबंधित अधिकारियों को आवेदन करें, और नुकसान के लिए दावा करें।