Jaltara Project : लोकसहभागातून पाणी साठवू या!' या संकल्पनेवर आधारित जिल्हा प्रशासनाच्या जलतारा उपक्रमाने वाशिममध्ये जलक्रांती घडवली आहे. कोट्यवधी लिटर पाणी जमिनीत मुरल्याने शाश्वत शेतीचा पाया अधिक मजबूत झाला आहे. (Jaltara Project)
वाशिम जिल्हा प्रशासनाच्या 'जलतारा शोषखड्डा अभियान' या उपक्रमामुळे जिल्हा आज शाश्वत जलसंपत्तीच्या दिशेने पुढे सरकत आहे. लोकसहभाग आणि प्रशासनाचे प्रयत्न यांच्या एकत्रित परिणामामुळे आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले आहे.(Jaltara Project)
या उपक्रमांतर्गत ४१ हजार शोषखड्डे खोदण्यात आले असून, पावसाळ्यात कोट्यवधी लिटर पाणी जमिनीत मुरले आहे. परिणामी जिल्ह्यातील विहिरी, कूपनलिका व जलस्रोत पुनर्भरण होऊन, शेतकऱ्यांची सिंचनाबाबतची चिंता कमी झाली आहे.(Jaltara Project)
लोकसहभागातून पाणी साठवू या!
दरवर्षी उन्हाळ्याच्या काळात जिल्ह्यातील अनेक भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असे. विहिरी कोरड्या पडणे, रब्बी पिकांवर मर्यादा येणे अशी परिस्थिती होती. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने लोकसहभागावर आधारित 'जलतारा' अभियान राबविले.
गावोगावी ग्रामसभांमधून शेतकरी, महिला बचतगट, सामाजिक संस्था यांना शोषखड्डे खोदण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. अनेक ठिकाणी तरुणांनी श्रमदानातून हे खड्डे तयार केले आणि थोड्याच काळात ४१ हजार जलतारे तयार झाले.
जलतारा उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
जिल्ह्यात खोदलेले शोषखड्डे: ४१ हजार
अंदाजे पाणी मुरले: कोट्यवधी लिटर
लाभार्थी गावे: सर्व ६ तालुके
उद्दिष्ट: भूजल पुनर्भरण, सिंचनक्षमता वाढवणे आणि शाश्वत शेतीला बळ देणे
जनतेचा जलसाठा
या यशस्वी मोहिमेने दाखवून दिले की शाश्वत विकासाचा पाया लोकसहभागातूनच रचला जातो. ग्रामस्थ, शेतकरी आणि सामाजिक संस्थांच्या सामूहिक सहभागामुळे आज जिल्ह्यातील जमिनीखालील पाण्याचा साठा लक्षणीयरीत्या वाढला आहे.
प्रत्येक शोषखड्डा म्हणजे एका शेतकऱ्याच्या भविष्याची हमी आहे. लोकसहभागातून जलसंपन्न वाशिम घडवण्याचे आमचे ध्येय बहुतांशी साध्य झाले आहे. - योगेश कुंभेजकर, जिल्हाधिकारी, वाशिम
Web Summary : Washim's 'Jaltara' project, driven by public participation, has significantly improved water availability. 41,000 soak pits recharge groundwater, benefiting farmers across all six talukas. Increased well water levels and enhanced irrigation capacity promise sustainable agriculture.
Web Summary : वाशिम की 'जलतारा' परियोजना ने, जनभागीदारी से, पानी की उपलब्धता बढ़ाई। 41,000 सोख गड्ढे भूजल को रिचार्ज करते हैं, जिससे सभी छह तालुकों के किसानों को लाभ होता है। बढ़े हुए जल स्तर और सिंचाई क्षमता से स्थायी कृषि का वादा।