Mahadbt Anudan : गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी महाडीबीटी पोर्टलवरील कृषी योजनांचे अनुदानाची वाट पाहत आहेत. हळूहळू काही योजनांसाठी निधीची उणीव भरून काढण्यात येत आहे. तत्पूर्वी महाडीबीटी अनुदान वितरणांबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कृषी विभागांतर्गत विविध योजना राबविल्या जातात. या योजना राबविण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविले जातात. त्यानंतर, केंद्र व राज्य शासनाच्या लक्षांक व निधि नुसार महाडीबीटी पोर्टलद्वारे कृषि यांत्रिकीकरण/इतर घटकातंर्गत निवड केली जाते. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी संबंधित घटक खरेदी केल्यानंतर अनुदान वितरण केले जाते.
सदर योजनांमध्ये यापुर्वी अकाऊंट बेस व आधार बेस पेमेंट पध्दतीने लाभार्थ्यांना अनुदान जमा करण्यात येत होते. मात्र आता केंद्र शासनाच्या सूचना प्रमाणे दिनांक. ०१ एप्रिल २०२६ पासून आधार बेस पेमेंट पद्धती वापरण्याचा सूचना कृषि विभागास प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे, ०१ एप्रिल २०२६ पासून महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील योजनांचे अनुदान वितरण हे आधार बेस पद्धतीनेच होणार आहे.
म्हणजेच, आता या पुढे महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करताना जोडलेले बँक खात्या एवजी लाभार्थी यांची आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये योजनांचे अनुदान जमा होणार आहे. या संदर्भात लाभार्थ्यांना केल्या जाणाऱ्या खाते-आधारित (अकाऊंट बेस) देयकांची प्रक्रिया १ एप्रिल २०२६ पासून PFMS द्वारे केली जाणार नाही याची खात्री करावी. तरी दि. १ एप्रिल २०२६ पासून सर्व लाभार्थ्यांची अनुदान अदायगी आधार बेस अप्रुवल घेऊनच करावी, असे सांगण्यात आले आहे.
Web Summary : Farmers awaiting Mahadbt Anudan, note: From April 1, 2026, subsidies will be disbursed only through Aadhaar-linked bank accounts. Account-based payments will cease via PFMS. Ensure Aadhaar linking for seamless transactions.
Web Summary : महाडीबीटी अनुदान का इंतजार कर रहे किसानों ध्यान दें: 1 अप्रैल, 2026 से सब्सिडी केवल आधार से जुड़े बैंक खातों के माध्यम से वितरित की जाएगी। खाता आधारित भुगतान PFMS के माध्यम से बंद हो जाएगा। सुचारू लेनदेन के लिए आधार लिंकिंग सुनिश्चित करें।