Join us
Daily Top 2Weekly Top 5

Jamin Satbara : सामायिक जमिनीतुन स्वतंत्र सातबारा उतारा कसा मिळवायचा, कोणती कागदपत्रे लागतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 20:35 IST

Jamin Satbara : सामायिक जमिनीतून स्वतःच्या वाट्याचा तुकडा वेगळा करून स्वतंत्र सातबारा उतारा मिळवणे होय.

Jamin Satbara :    सातबारा सुटा करणे (विभाजन/फाळणी) म्हणजे सामायिक जमिनीतून स्वतःच्या वाट्याचा तुकडा वेगळा करून स्वतंत्र सातबारा उतारा मिळवणे होय. ही प्रक्रिया महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अंतर्गत तलाठी कार्यालयामार्फत वारसाहक्काने किंवा खरेदीने मिळालेल्या जमिनीच्या वाटणीसाठी केली जाते, ज्यामुळे भूखंडांची स्वतंत्र नोंद होते. 

सातबारा सुटा करण्याची प्रक्रिया  :अर्ज दाखल करणे : सामायिक सातबारा उताऱ्यातील सर्व सहधारकांची संमती आवश्यक आहे. सर्व मालकांनी तलाठ्याकडे 'फाळणी' किंवा 'विभाजन' अर्ज (फॉर्म ६) करावा. 

कागदपत्रे :  

  • सामायिक सातबारा उताऱ्याची साक्षांकित प्रत
  • ८-अ उतारा.
  • सर्व मालकांचे संमतीपत्र
  • आधार कार्ड, पॅन कार्ड
  • जमिनीचा नकाशा (आवश्यक असल्यास) 

 

जमीन मोजणी : अर्जानंतर भूमी अभिलेख विभागामार्फत (दप्तरखाना) जमिनीची मोजणी केली जाते. फेरफार नोंद : मोजणीनंतर प्रत्येक शेतकऱ्याचा हिस्सा निश्चित करून तलाठ्याकडून स्वतंत्र सातबारा उतारा तयार केला जातो. 

फायदे : स्वतंत्र मालकी : जमिनीच्या स्वतंत्र तुकड्यावर पूर्ण मालकी हक्क मिळतो.कर्ज/विक्री : स्वतंत्र सातबारा असल्याने बँकेकडून कर्ज घेणे किंवा जमीन विकणे सोपे होते.वाद सुटतात : जमिनीच्या वाटणीवरून होणारे कौटुंबिक किंवा न्यायालयीन वाद मिटतात. टीप : जर जमिनीच्या वाटणीवरून वाद असतील, तर ही प्रक्रिया न्यायप्रविष्ठ होऊ शकते. अधिक माहितीसाठी महाभुलेख वेबसाईट पहा

English
हिंदी सारांश
Web Title : Get Separate Satbara Extract from Shared Land: A Guide

Web Summary : Separate Satbara extract from shared land involves application, measurement, and document submission. This creates independent land ownership, eases loans/sales, and resolves disputes. Landowners need consent and specific documents for the process.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकृषी योजना