Shetkari Karjmafi : राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने'त शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.
या योजनेचा लाभघेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण अनिवार्य असणार आहे. ज्या पात्र शेतकऱ्यांनी हे प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांना लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. हे आधार प्रमाणीकरण कसे करावे, हे समजून घेऊयात...
आधार प्रमाणीकरण (KYC) कसे करावे?
- 'आपले सरकार' केंद्र/CSC Center : सर्वात जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण/केवायसी (KYC) करून घेणे सर्वात सोपा पर्याय आहे.
- आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि मोबाईल नंबर सोबत ठेवावा.
- प्रक्रिया कशी असते? : केंद्रावर आपले बोटांचे ठसे (Biometric) किंवा ओटीपी (OTP) द्वारे आधार प्रमाणीकरण पूर्ण केले जाते.
महत्त्वाचे मुद्दे -
प्रमाणिकरण अनिवार्य : आधार प्रमाणीकरण न केल्यास कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार नाही.
नियमित कर्जदार : जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, त्यांना ५० हजार रुपयांपर्यंतच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी हे प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.
वेळ मर्यादा : सहकारी विभागाच्या सूचनेनुसार, पात्र शेतकऱ्यांनी त्वरित केवायसी पूर्ण करावी.
Pik Karj : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मोठा दिलासा, पीक कर्जासाठी 'ती' अट रद्द, कोटी रुपये वाचणार
Web Summary : Farmers, Aadhaar KYC is mandatory for the Ahilyadevi Holkar loan waiver scheme up to ₹2 lakh. Regular payers get ₹50,000 incentive. Complete KYC at CSC centers with Aadhaar, passbook, and mobile number to avoid issues.
Web Summary : किसानों के लिए अहिल्यादेवी होल्कर ऋण माफी योजना के लिए आधार केवाईसी अनिवार्य है, जिसमें ₹2 लाख तक की छूट है। नियमित भुगतान करने वालों को ₹50,000 का प्रोत्साहन मिलेगा। समस्याओं से बचने के लिए आधार, पासबुक और मोबाइल नंबर के साथ सीएससी केंद्रों पर केवाईसी पूरा करें।