Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर, हार्वेस्टरसह विविध कृषी अवजारांना किती अनुदान मिळते, अर्ज कुठे करायचा, वाचा संपूर्ण प्रक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 18:35 IST

Krushi Yantrikikaran Yojana : शेतकऱ्यांची प्रगती साधली जावी, या हेतूने शासनाने कृषी यांत्रीकीकरण योजना कार्यान्वीत केली आहे. 

भंडारा : कमी श्रम व वेळात अधिक उत्पादनाचे तंत्र आत्मसात व्हावे, यातून शेतकऱ्यांची प्रगती साधली जावी, या हेतूने शासनाने कृषी यांत्रीकीकरण योजना कार्यान्वीत केली आहे. 

सन २०२५-२६ या वर्षीत कृषी यांत्रीकीकरण योजने अंतर्गत प्राप्त १२ कोटी ८८ लाख ५५ हजार ५४९ रूपयांच्या शासन निधीपैकी ट्रॅक्टर, हार्वेस्टर व अन्य कृषी उपयोगी औजारे व साहित्य खरेदीसाठी १२ कोटी ४८ लाख ३ हजार ३७३ रूपयांचे अनुदान थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. या निधीतून १८६ ट्रॅक्टर, ४३ हार्वेस्टर व ६१० अन्य कृषी साहित्य व औजारांची खरेदी व वितरण झाले आहे.

कृषी अवजारांसाठी नोंदणी व लाभार्थ्यांची निवडयावर्षी कृषी अवजारांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्राप्त झाले होते. एकूण प्राप्त अर्जापैकी २५११२ शेतकऱ्यांची लॉटरीद्वारे निवड करण्यात आली. पूर्व संमती पत्र मिळाल्यानंतर पूर्वी ३० दिवसांची प्रत्यक्ष खरेदीसाठी शेतकऱ्यांना मुदत दिली जात होती. आता ही अट शिथील करण्यात आली आहे.

अवजारांचे प्रकार व मिळणाऱ्या अनुदानाची मर्यादाजिल्ह्यात धानाची व्याप्ती लक्षात घेता पेडी ट्रान्सप्लांटर (धान लागवड यंत्र) आणि कम्बाईन हार्वेस्टर खरेदीसाठी १४१, तर हार्वेस्टरसाठी १८८० अर्ज कृषी विभागाला प्राप्त झाले.

ट्रॅक्टर खरेदीसाठी अल्प, अत्यल्प व महिला शेतकऱ्यांना १ लाख २५ हजाराचे, औजारांसाठी किमतीच्या ५० टक्के अनुदान दिले जाते. बहुभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी १ लाखाचे, तर औजारांसाठी किमतीच्या ४० टक्के अनुदान दिले जाते.

योजनेची अंमलबजावणी व तांत्रीक तपासणीसुमारे १ लाख किमतीवरील औजारे व यंत्रांसाठी मंडळ कृषी अधिकारी तपासणी करतात. त्याखालील यंत्र व औजारांची तपासणी उपकृषी अधिकारी करतात. शेतकऱ्यांनी बील सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम शासनस्तरावरून अनुदानाची रक्कम प्राप्त होताच १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. जिल्ह्यात भाड्याने अवजारे देण्यारे केंद्र उभारण्यासाठी २३४ शेतकरी उत्पादक कंपनी व गटांनी अर्ज दाखल केले आहेत.

ट्रॅक्टर, हार्वेस्टर व औजारांसाठी मिळालेले अनुदानजिल्ह्यात कृषी यांत्रीकीकरण योजने अंतर्गत १८६ ट्रैक्टर खरेदीसाठी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात २ कोटी २५ लाखांचे, तर ४३ हार्वेस्टर खरेदीसाठी ४ कोटी ६४ लाखांचे अनुदान जमा करण्यात आले. ट्रॅक्टरचलीत इतर ६१० अवजारांच्या खरेदीसाठी ४ कोटी ७३ लाखांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आले. या व्यतिरिक्त मनुष्य किंवा बैलचलीत औजारांचा ६७ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला.

 

Tur Bajarbhav : यंदाच्या एप्रिल महिन्यात तुरीचे दर कसे राहतील, MSP च्या पुढे जातील का? वाचा सविस्तर

 

English
हिंदी सारांश
Web Title : Agricultural machinery subsidies: Amount, application process, and complete information.

Web Summary : Maharashtra farmers received ₹12.48 crore in subsidies for tractors, harvesters, and other agricultural equipment under the Krishi Yantrikikaran Yojana. 186 tractors, 43 harvesters and 610 other agricultural tools were distributed. Farmers selected via lottery, receive up to 50% subsidy.
टॅग्स :कृषी योजनाशेतीशेती क्षेत्रशेतकरी