lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > मधमाशी पालनाचे प्रकार कोणकोणते? 

मधमाशी पालनाचे प्रकार कोणकोणते? 

Latest News honey bee story What are the types of bee keeping? | मधमाशी पालनाचे प्रकार कोणकोणते? 

मधमाशी पालनाचे प्रकार कोणकोणते? 

शेती पूरक व्यवसाय म्हणून आता मधुमक्षिका पालनाकडे शेतकऱ्यांसह तरुण वर्ग वळू लागला आहे.

शेती पूरक व्यवसाय म्हणून आता मधुमक्षिका पालनाकडे शेतकऱ्यांसह तरुण वर्ग वळू लागला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

आतापर्यंत आपण मधमाशांचा इतिहास, त्यांचे संवर्धन, मध माशांचे प्रकार आणि प्रजाती कोणकोणत्या हे देखील समजून घेतले. यानंतर मुख्यत्वे मधमाशी पालनाचे प्रकार कोणकोणते हे समजून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून मधमाशांचे संगोपन करणे काळाची गरज बनली आहे. त्या अनुषंगाने अनेकांना याबाबत माहिती मिळावी, या हेतूने हा मुद्दा आवश्यक आहे. कारण अनेकजण मधमाशी पालनाकडे वळू लागले आहेत. 

सद्यस्थितीत मधुमक्षिका पालनाकडे आकर्षित होऊ लागले आहे. मधापासून ते अनेक गोष्टीपर्यंत मधमाशांचा उपयोग होत असल्याने याकडे शेती पूरक व्यवसाय म्ह्णून पाहिले जात आहे. मधुमक्षिकापालन म्हणजे काय तर मधमाशांचे संगोपन करणे. या मधमाशांच्या माध्यमातून मध आणि मेण उपलब्ध होत असते. मधमाशी ही फुलातील रसाला/परागांना मधात बदलविते व त्यास आपल्या पोळ्यात जमा करते. जंगलातून व इतर ठिकाणांहून मध गोळा केले जाते. बाजारात मधाच्या मागणीस वाढता प्रतिसाद बघता मधमाशी पालन हा एक फायदेशीर व आर्थिक प्राप्ती देणारा उद्योग आहे. त्यामुळे मधुमक्षिका पालन केले जात आहे. 

मध आणि मेणाचा उपयोग काय? 


मधमाशी पालन म्हणजे मधमाश्यांच्या वसाहतींची देखभाल करणे. प्रामुख्याने मधमाशांच्या चार जाती ओळखल्या जातात. मधमाशांद्वारे मध आणि मेण उपलब्ध होत असते. मध विविध संक्रमणांसाठी घरगुती उपाय म्हणून तसेच अन्न स्रोत म्हणून वापरले जाते; तर मेणाचा पॉलिशिंग आणि कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये वापर केला जातो. कोणत्याही इतर जास्तीच्या खताशिवाय, बियांशिवाय मधमाशी पालन हे शेताच्या बांधावर/शेतालगत केल्याने त्याचा फायदा शेतीला होतो. शेतीतील भाजी, फुलांच्या उत्पादनात चांगली वाढ होते. कारण मधमाशा परागीकरणाचे काम उत्तमरित्या करत असतात. एकूणच आर्थिक स्थिती बळकट होत असल्याने रोजगाराचा प्रश्न सुटतो.

मधमाशीपालनाचे प्रकार

मधमाशी पालनाचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. यात पारंपारिक मधमाशीपालन, आधुनिक मधमाशीपालन आणि व्यावसायिक मधमाशीपालन या तिन्ही प्रकाराचा समावेश होतो. 
पारंपारिक मधमाशीपालन : या मधमाशी पालनात लाकूड आणि पेंढ्यापासून बनवलेल्या पारंपारिक मधमाश्या आणि वर्षानुवर्षे  वापरल्या जात असलेल्या पद्धतींचा समावेश आहे. 
आधुनिक मधमाशीपालन : या पद्धतीत प्लास्टिक किंवा धातूपासून बनवलेल्या आधुनिक पोळ्यांचा वापर करणे आणि मध उत्पादन आणि वसाहती व्यवस्थापन सुधारण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करणे इत्यादी गोष्टीचा समावेश आहे. 
व्यावसायिक मधमाशीपालन : या मधमाशी पालनात व्यावसायिक हेतूंसाठी मध आणि इतर मधमाशी उत्पादनांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन समाविष्ट आहे. 

Web Title: Latest News honey bee story What are the types of bee keeping?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.