Gram Panchayat : ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यांची तक्रार वेगवेगळ्या पातळ्यांवर करता येते. रस्ता कोणत्या योजनेतून झाला आहे, त्यावरून संबंधित संस्थेला अर्ज करता येतो.
थेट ग्रामपंचायत कडे
ग्रामसेवक / सरपंच यांच्याकडे लेखी तक्रार द्यावी.
ग्रामपंचायत सभेत तक्रार नोंदवून ठराव घेता येतो.
पंचायत समिती (Block Level)
तालुक्यातील गटविकास अधिकारी (BDO) यांच्याकडे तक्रार करता येते.
रस्त्याची कामे "ग्रामविकास विभाग" यांच्या नियंत्रणाखाली असतात.
जिल्हा परिषद (ZP)
जिल्हा परिषद अभियंता / मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याकडे तक्रार देता येते.
"प्रधानमंत्री ग्राम सडक योजना" किंवा "जि.प. निधी" मधील रस्ते असल्यास जिल्हा परिषद जबाबदार असते.
ऑनलाईन तक्रार
MahaGov Portal/Aaple Sarkar Portal वर रस्त्याबाबत ऑनलाइन तक्रार दाखल करता येते.
रस्ता कोणत्या प्रकारचा आहे, त्यानुसार जबाबदार संस्था
- गावातील छोट्या गल्ली/अंतर्गत रस्ते - ग्रामपंचायत
- गाव जोड रस्ते (GP ते दुसरे गाव) - पंचायत समिती (BDO ऑफिस) /जिल्हा परिषद अभियंता
- मुख्य जिल्हा रस्ते / राज्य महामार्ग PWD (सार्वजनिक बांधकाम विभाग)
- प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) अभियंता जिल्हा परिषद व संबंधित
RTI (माहितीचा अधिकार) दाखल करा
अधिकृत वेबसाईट https://rtionline.maharashtra.gov.in
जर रस्त्याचे काम झाले नाही, निधी आला की नाही याची माहिती हवी असेल तर ऑनलाइन RT। दाखल करता येते. यामुळे संबंधित विभागाला उत्तर द्यावेच लागते.
तक्रार करताना काय लिहावे?
स्त्याचे नाव / गाव / वार्ड क्र., समस्या (उदा. खड्डे, चिखल, पावसात वाहतूक बंद, अपघाताचा धोका), तातडीची गरज (शाळा, रुग्णालयाचा मार्ग अडतो इ.).
फोटो/व्हिडिओ जोडल्यास तक्रारीला जास्त वजन मिळते.