Join us

Gopinath Munde Sugarcane Workers Scheme : ऊसतोडणी दरम्यान अपघात झाला तर किती मदत मिळते? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 12:36 IST

Gopinath Munde Sugarcane Workers Scheme : गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे अपघातग्रस्त ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. या योजनेमुळे अपघातानंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना आधार मिळाला आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती (Gopinath Munde Sugarcane Workers Scheme)

Gopinath Munde Sugarcane Workers Scheme : बीड जिल्ह्यातील ३८ अपघातग्रस्त ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना दिलासा. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये एकूण १ कोटी ९० लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आला आहे.(Gopinath Munde Sugarcane Workers Scheme)

या योजनेमुळे अपघातानंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना आधार मिळाला आहे.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे अपघातग्रस्त ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार आणि मुकादम यांना दिलासा मिळत आहे.(Gopinath Munde Sugarcane Workers Scheme)

२०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षांत बीड जिल्ह्यातील ३८ कामगारांचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना एकूण १ कोटी ९० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.(Gopinath Munde Sugarcane Workers Scheme)

योजनेची पार्श्वभूमी

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची सानुग्रह अनुदान योजना १० ऑक्टोबर २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार आणि मुकादम यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

राज्यात सुमारे ८ ते १० लाख ऊसतोड कामगार कार्यरत आहेत. यातील बहुतांश कामगार मराठवाडा पट्ट्यातील बीड, अहमदनगर, जालना, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातून येतात.

ऊसतोड कामगारांचे प्रश्न

ऊसतोडणी आणि वाहतुकीदरम्यान वारंवार अपघात होत असल्याने कामगारांचा मृत्यू किंवा अपंगत्वाच्या घटना घडतात. अशा वेळी कुटुंबाचे उत्पन्न थांबते आणि उपजीविकेवर मोठा परिणाम होतो. हे टाळण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.

कशासाठी किती मदत?

प्रकारसानुग्रह अनुदानाची रक्कम
झोपडीला आग व सामग्री जळाल्यास१०,०००
वैयक्तिक अपघात (मृत्यू)२,५०,०००
वैयक्तिक अपघात (अपंगत्व)२,५०,०००
वैद्यकीय खर्च (अपघात)५०,०००
बैलजोडी लहान (मृत्यू/अपंगत्व)७५,०००
बैलजोडी मोठी (मृत्यू/अपंगत्व)१,००,०००

कोणते अपघात समाविष्ट?

ऊसतोडणी व वाहतुकीदरम्यान होणारे अपघात

सर्पदंश

विजेचा धक्का

नैसर्गिक आपत्ती

रस्ते अपघात, वाहन अपघात

अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात

लाभ मिळवण्यासाठी प्रक्रिया

अपघात झाल्यानंतर एक महिन्यात कामगारांच्या कुटुंबांनी समाजकल्याण विभागाकडे अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यासाठी ग्रामसेवकाकडून ऊसतोड कामगार असल्याचे प्रमाणपत्र, मृत्यू दाखला किंवा अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, आवश्यक ओळखपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या कामगारांच्या कुटुंबांनी अपघातानंतर एक महिन्यात समाज कल्याण विभागाकडे अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. ग्रामसेवकांकडून ऊसतोड कामगार असल्याचे ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र, मृत्यूचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. - प्रदीप भोगले, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, बीड

हे ही वाचा सविस्तर : Ustod Kamagar : ऊसतोड कामगारांना मोठा दिलासा; सानुग्रह अनुदानात दुप्पट वाढ होणार वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रऊसशेतकरीशेतीकृषी योजना