यवतमाळ : संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांनी न्यायासाठी दिलेला लढा अखेर यशस्वी झाला आहे. (Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana)
यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने दिलेल्या दोन महत्त्वपूर्ण निर्णयामुळे बोथबोडण आणि श्रीकृष्णनगर येथील शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana)
विमा नाकारणाऱ्या कंपनीला आणि जाचक अटी लादणाऱ्या फायनान्स कंपनीला आयोगाने चपराक लगावली आहे.(Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana)
प्रकरण १: विमा कंपनीला ८ टक्के व्याजासह भरपाईचे आदेश
नांदेड जिल्ह्यातील श्रीकृष्णनगर येथील आम्रपाला परमेश्वर काळबांडे यांचे पती परमेश्वर काळबांडे यांचा १५ एप्रिल २०२१ रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विम्याच्या लाभासाठी त्यांनी दावा केला होता. मात्र, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीने 'चालकाकडे परवाना नव्हता' असे कारण देत हा दावा नाकारला होता.
आयोगाने काय दिला निकाल
आम्रपाला काळबांडे यांनी याविरोधात यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली. आयोगाने स्पष्ट केले की, काळबांडे यांचा मृत्यू हा 'चारचाकी वाहनाच्या धडकेमुळे' झाला आहे, त्यामुळे विम्याचा लाभ नाकारणे चुकीचे आहे.विमा रक्कम: २ लाख रुपये (८ टक्के व्याजासह).
मानसिक त्रास भरपाई: १० हजार रुपये.
तक्रार खर्च: ५ हजार रुपये.
प्रकरण २: कर्जमाफीचा लाभ नाकारणाऱ्या फायनान्स कंपनीला दणका
बोथबोडण येथील ज्ञानेश्वर दादाराव येरके यांनी महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर घेतला होता. दरम्यान, कर्जाच्या विवंचनेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यानंतर कोरोनाकाळात त्यांचे कुटुंबीय कर्जाचे हप्ते नियमित भरू शकले नाहीत.
शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा यासाठी कुटुंबाने विनंती केली, परंतु कंपनीने ती फेटाळली.
आयोगाने काय दिला निकाल
ग्राहक आयोगाने नमूद केले की, फायनान्स कंपनीने ग्राहकाला सेवा देण्यात कसूर केली असून 'अनुचित व्यापार प्रथेचा' अवलंब केला आहे.
आदेश काय सांगतो
कर्जाची रक्कम वसूल केल्यानंतर कुटुंबाला 'नाहरकत प्रमाणपत्र' (NOC) देण्यात यावे.
भरपाई: शारीरिक व मानसिक त्रासापोटी ५ हजार रुपये आणि तक्रार खर्चाचे ५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.
यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र उल्हास मराठे आणि सदस्या मनीषा वनमारे यांच्या उपस्थितीत या दोन्ही प्रकरणांवर सुनावणी होऊन हा न्यायनिवाडा करण्यात आला.
हे ही वाचा सविस्तर : Gahu Bajarbhav: गहू हंगामातच तेजीत! दर वाढले; आता विकू की थांबू
अधिक वाचा : Karjamafi : कर्जमाफी मिळणार तरी कधी? शेतकरी वाट पाहतोय!
Web Summary : Yavatmal consumer forum ruled in favor of farmer families denied insurance under Gopinath Munde scheme and loan waivers. Insurance company ordered to pay compensation with interest. Finance company directed to provide NOC.
Web Summary : यवतमाल उपभोक्ता फोरम ने गोपीनाथ मुंडे योजना और ऋण माफी के तहत बीमा से वंचित किसान परिवारों के पक्ष में फैसला सुनाया। बीमा कंपनी को ब्याज के साथ मुआवजा देने का आदेश दिया गया। वित्त कंपनी को एनओसी प्रदान करने का निर्देश दिया गया।