Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > 75 दिवसांत उत्पन्न देणारी ग्लॅडिओलस फुलशेती, हेक्टरी अडीच लाख फुलदांड्यांचे उत्पादन, भावही चांगला

75 दिवसांत उत्पन्न देणारी ग्लॅडिओलस फुलशेती, हेक्टरी अडीच लाख फुलदांड्यांचे उत्पादन, भावही चांगला

Latest News Gladiolus flower cultivation that yields in 75 days, production of 2.5 lakh flower stalks per hectare | 75 दिवसांत उत्पन्न देणारी ग्लॅडिओलस फुलशेती, हेक्टरी अडीच लाख फुलदांड्यांचे उत्पादन, भावही चांगला

75 दिवसांत उत्पन्न देणारी ग्लॅडिओलस फुलशेती, हेक्टरी अडीच लाख फुलदांड्यांचे उत्पादन, भावही चांगला

Gladiolus flower : मोगरा, गुलाब, सोनचाफा, तसेच ऑर्किडप्रमाणेच ग्लॅडिओलस फुलशेतीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

Gladiolus flower : मोगरा, गुलाब, सोनचाफा, तसेच ऑर्किडप्रमाणेच ग्लॅडिओलस फुलशेतीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

- अनिरुद्ध पाटील 
ठाणे :
पालघर जिल्ह्यात मोगरा, गुलाब, सोनचाफा, तसेच ऑर्किडप्रमाणेच ग्लॅडिओलस फुलशेतीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. डहाणूतील कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात याबाबतची प्रायोगिक लागवड यशस्वी झाल्याची माहिती प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी दिली. या जिल्ह्यात लागवडीस अनुकूल जमीन, हवामान तसेच मुंबई बाजारपेठ असल्याने ही शेती फायद्याची ठरणार आहे.

कमी कालावधी, जास्त उत्पन्न
ग्लॅडिओलस हे व्यापारी फूल पीक असून, दांड्यावर आकर्षक फुले येतात. अनेक रंगछटा, गुच्छ तयार करणे आणि सजावटीसाठी या फुलांना वर्षभर मागणी असते.या रब्बी हंगामातील पिकाला कडक उन्हाळा आणि जोरदार पाऊस वगळता वर्षभर लागवड करता येते. फुलांच्या आकर्षक रंगासाठी २० ते ३० अंश सेल्सिअस थंड तापमान, कोरडे व कमी पावसाचे हवामान अनुकूल असते.

प्रतिहेक्टर अडीच लाख फुलदांड्यांचे उत्पादन
संसरे (पांढरा रंग), यलोस्टोन (पिवळा), ट्रॉपीकसीस (निळा), फुले गणेश (फिका पिवळा), फुले प्रेरणा (फिका गुलाबी), नजराणा (गर्द गुलाबी), पुसा सुहागन (लाल), हंटिंग साँग (केशरी) या फुलांना मागणी आहे. योग्य व्यवस्थापनातून प्रतिहेक्टर दीड लाख ते अडीच लाख फुलदांडे मिळतात. १२ फुलदांड्यांची जुडी बांधून बाजारपेठेत पाठवतात. एका फुलदांडीला १२ ते १५ रुपये मिळतात.

पालघर जिल्ह्यात ग्लॅडिओलस लागवडीस अनुकूल वातावरण, मुंबईची बाजारपेठ फायदेशीर आहे. लागवडीपासून ६५ ते ७५ दिवसांनी उत्पन्न मिळते. या फुलपिकासाठी शास्त्रज्ञ अशोक भोईर, प्रक्षेत्र व्यवस्थापक प्रशांत वरठा मार्गदर्शन करतात.
- डॉ. विलास जाधव, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र कोसबाड, हिल

Web Title : ग्लैडियोलस फूलों की खेती से 75 दिनों में मुनाफा, अच्छा बाज़ार भाव।

Web Summary : पालघर जिले में ग्लैडियोलस फूलों की खेती एक विकल्प है। अनुकूल जलवायु और मुंबई बाजार तक पहुंच के साथ, 75 दिनों में प्रति हेक्टेयर 2.5 लाख फूलों की डंठलें मिलती हैं, जिससे प्रति डंठल ₹12-₹15 मिलते हैं।

Web Title : Gladiolus flower farming yields profit in 75 days, good market price.

Web Summary : Palghar offers gladiolus farming as an alternative crop. With favorable climate and Mumbai market access, yields reach 2.5 lakh flower stalks per hectare in 75 days, fetching ₹12-₹15 per stalk.