Join us

किती पाऊस झाल्यावर पेरणी कराल? आंतरपिके कोणती घ्याल? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 18:15 IST

Best Time to Sow Kharif Crops: सद्यस्थितीत राज्यातील अनेक भागात पावसाने (Avkali Paus) जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पेरणी कधी करावी? खरीप हंगामाची पेरणी करण्याची योग्य वेळ कोणती हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Agriculture News :  सद्यस्थितीत राज्यातील अनेक भागात पावसाने (Avkali Paus) जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामाची लगबग करीत आहेत. अशा स्थितीत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी सामान्य कृषी सल्ला देण्यात आला आहे. 

शिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची (Cultivation) घाई करू नये, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नेमकी पेरणी कधी करावी, कोरडवाहू पिकांसाठी काय सल्ला, आंतरपिके कोणती घेता येतील, हे समजून घेऊयात... 

अशी घ्या काळजी वापसा आल्यानंतर कुळवाने मशागत करावी, म्हणजे उगवलेल्या ताणाचा बंदोबस्त होईल. शेत पेरणी योग्य होईल.खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार व प्रमाणित बियाण्याचे नियोजन करावे.जमीनीतील तापमान कमी झालेले नसतानाही कापूस पिकाची लागवड केल्यास कीड व रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे जमीनीतील तापमान कमी झाल्याशिवाय लागवडीची घाई करू नये.

कोरडवाहू पिकेहलक्या जमिनीत वापसा आल्यानंतर कुळवाने पूर्व मशागत करून बियाण्यास फुले सुपर बायोमिक्सची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी.कोरडवाहू भागात ज्या ठिकाणी जमिनीची पूर्व मशागत झालेली असल्यास आणि पेरणी योग्य १०० मी मी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अशा ठिकाणी वापसा आल्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे खाली नमूद केल्या प्रमाणे पेरणी करावी.

हलकी जमीन : हुलगा, मटकीमध्यम व भारी जमीन : उडीद, मूग, चवळी, सूर्यफूल, तूर

आंतरपिक पद्धत : येत्या कालावधी मधील पावसाची अनिश्चितता लक्षात घेता, कोरडवाहू विभागामध्ये तूर अधिक सूर्यफूल (२:१), तूर + बाजरी (२:१), तूर + मूग / उडीद (२:१) या आंतरपीक पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरू शकेल.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीकृषी योजनामोसमी पाऊसमानसून स्पेशलमोसमी पावसाचा अंदाजपाऊस