Join us
Daily Top 2Weekly Top 5

Fruit Orchard Cultivation : वाशिमच्या फळबागांवर संत्राचाच ताबा; विविधतेअभावी फळबाग विस्ताराला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:41 IST

Fruit Orchard Cultivation : राज्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्र १४ लाख हेक्टरांपर्यंत पोहोचले असताना, वाशिम जिल्ह्यात मात्र केवळ १५,५१५ हेक्टरवरच फळबाग लागवड आहे. राज्याच्या एकूण फळबाग क्षेत्रात वाशिमचा वाटा फक्त १.११ टक्के असून, संत्र्यावर असलेले अवलंबित्व आणि विविधतेचा अभाव स्पष्ट झाला आहे. (Fruit Orchard Cultivation)

Fruit Orchard Cultivation : राज्य शासनाच्या विविध फलोत्पादन योजनांमुळे महाराष्ट्रात फळबाग लागवडीखालील एकूण क्षेत्र सुमारे १४ लाख हेक्टरांपर्यंत पोहोचले असले, तरी वाशिम जिल्हा या बाबतीत मोठ्या प्रमाणात मागे पडलेला दिसत आहे. (Fruit Orchard Cultivation)

जिल्ह्यात फक्त १५,५१५ हेक्टर क्षेत्रावरच फळबाग लागवड असून, राज्याच्या एकूण फळबाग क्षेत्रात वाशिमचा वाटा केवळ १.११ टक्के इतकाच आहे.(Fruit Orchard Cultivation)

संत्र्याचे वर्चस्व; विविधतेचा अभाव

वाशिम जिल्ह्यातील फळबाग लागवडीत संत्रा हे प्रमुख फळपीक ठरले आहे. जिल्ह्यातील १३,०६५ हेक्टर क्षेत्रावर संत्र्याची लागवड असून, हे प्रमाण एकूण फळबाग क्षेत्राच्या सुमारे ८४ टक्के इतके आहे. त्यामुळे जिल्ह्यात फळपिकांची विविधता अत्यंत मर्यादित राहिली आहे.(Fruit Orchard Cultivation)

संत्र्यानंतर पेरू (१,०१५ हेक्टर), सीताफळ (५४९ हेक्टर), लिंबू (३५३ हेक्टर), आंबा (२९४ हेक्टर) आणि केळी (१२७ हेक्टर) अशी फळपिके घेतली जात असली, तरी चिकू, अंजीर, फणस, ड्रॅगन फ्रूट यांसारखी आधुनिक व बाजारपेठीय मागणी असलेली फळपिके अत्यल्प क्षेत्रापुरतीच मर्यादित आहेत.(Fruit Orchard Cultivation)

पाण्याची टंचाई ठरते मोठा अडसर

राज्याच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात फळबाग क्षेत्र कमी असण्यामागे पाण्याच्या शाश्वत सुविधांचा अभाव, मोठ्या सिंचन प्रकल्पांची कमतरता, पर्जन्यमानावर अवलंबून शेती आणि जोखीम पत्करण्याबाबत शेतकऱ्यांची मर्यादित तयारी ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय संत्र्यावर असलेले अविलंबित्वही फळबाग विस्ताराला अडथळा ठरत आहे.

इतर जिल्ह्यांशी तुलना

नाशिक, पुणे, कोल्हापूर, जळगाव यांसारख्या जिल्ह्यांत द्राक्ष, डाळिंब, केळी, पपई, स्ट्रॉबेरी आदी फळपिकांमुळे फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात फळबाग लागवडीतील विविधता कमी असल्याने जिल्हा राज्याच्या सरासरीपेक्षा बऱ्याच प्रमाणात मागे आहे.

आगामी काळात सुधारणा अपेक्षित

वाशिम जिल्ह्यात फळबाग लागवड वाढविण्यासाठी सूक्ष्म सिंचन योजना, बहुविध फळपिकांचा प्रसार, आधुनिक तंत्रज्ञान, शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहनपर अनुदान योजना प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासोबतच जिल्ह्याची फलोत्पादनातील कामगिरी सुधारू शकते.

वाशिम जिल्ह्यात संत्र्याचे प्राबल्य आहे; मात्र इतर फळपिकांचा विस्तार अपेक्षित आहे. सूक्ष्म सिंचन, विविध फळबाग लागवड आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनांच्या माध्यमातून आगामी काळात फळबाग क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येतील.- आरीफ शाह,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

हे ही वाचा सविस्तर : Natural Farming : नैसर्गिक शेतीला मोठी चालना; सरकार देणार अनुदान वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Washim's Fruit Orchards Dominated by Oranges; Diversity Needed for Growth

Web Summary : Washim's fruit orchard area lags behind Maharashtra, dominated by oranges (84%). Limited water access and risk aversion hinder expansion. Experts emphasize diversification, micro-irrigation, and farmer support for growth. Other districts excel with diverse fruit cultivation.
टॅग्स :शेती क्षेत्रफळेशेतकरीशेती