Lokmat Agro >शेतशिवार > Flower Gardning : ऑगस्ट महिन्यात 'या' फुलांची लागवड करा, 'या' आहेत सोप्या टिप्स 

Flower Gardning : ऑगस्ट महिन्यात 'या' फुलांची लागवड करा, 'या' आहेत सोप्या टिप्स 

Latest news Flowers Gardening Plant these flowers in month of August, here are some simple tips | Flower Gardning : ऑगस्ट महिन्यात 'या' फुलांची लागवड करा, 'या' आहेत सोप्या टिप्स 

Flower Gardning : ऑगस्ट महिन्यात 'या' फुलांची लागवड करा, 'या' आहेत सोप्या टिप्स 

Flower Gardning : सध्या ऑगस्ट महिना सुरु असून या महिन्यात कोणती फुले लावावीत, असा अनेकांना प्रश्न पडतो?

Flower Gardning : सध्या ऑगस्ट महिना सुरु असून या महिन्यात कोणती फुले लावावीत, असा अनेकांना प्रश्न पडतो?

शेअर :

Join us
Join usNext

Flower Gardning :  अनेकजण घराच्या बाल्कनीमध्ये फुलांची लागवड (Flowers Garden) करत असतात. अशा विविध फुलांच्या लागवडीमुळे बाल्कनी सुंदर दिसते.

सध्या ऑगस्ट महिना सुरु असून या महिन्यात कोणती फुले लावावीत, असा अनेकांना प्रश्न पडतो? जर तुम्हाला माहिती नसेल, तर या लेखातून आपण काही फुलांच्या लागवडीबाबत माहिती घेऊयात... 

जास्वंदाचे फूल-
जास्वंदाचे रोप ऑगस्ट महिन्यात लावावे. यासाठी १२-१४ इंचाची कुंडी घ्यावे. त्यात योग्यरीत्या माती भरून घ्यावी. त्यानंतर रोप लावावे. त्यानंतर पाणी ओतावे. जास्वंदाला दररोज किमान ५-६ तास थेट सूर्यप्रकाशात ठेवावे. उन्हाळ्यात दररोज आणि हिवाळ्यात आठवड्यातून २-३ वेळा पाणी द्यावे. हे रोप घराचे वातावरण शुद्ध करते.

झेंडूचे फूल-
झेंडूचे फूल ऑगस्ट महिन्यात लावावे. झेंडूचे फूल कलमे किंवा बियाण्यांपासून लावता येते. ते लावण्यासाठी चांगल्या दर्जाचे बियाणे, माती आणि कोको पीट यांचे मिश्रण बनवावे. त्यानंतर त्यात बियाणे किंवा कलमे लावावीत. झेंडूचे फूल लावल्यानंतर त्याला पाणी द्यावे. कटिंग पद्धतीने रोप लावण्यासाठी ४-६ इंचाचा कट घेऊन तो जमिनीत लावावा. झेंडूचे फूल ६० ते ७० दिवसांत तयार होते आणि ९० ते १०० दिवसांत फुलण्यास सुरुवात होते.

सूर्यफूल -
सूर्यफूल ऑगस्ट महिन्यात देखील लावता येते. सर्वप्रथम, बियाणे कुंडीत पेरावे. ही कुंडी मंद सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी ठेवावी. रोपांना नियमित पाणी द्यावे. ज्या कुंडीत सूर्यफूल रोप लावायचे आहे, त्या कुंडीत पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था असावी. सूर्यफूलाचे फूल ८०-१०० दिवसांत फुलू लागते.

डेलिया फूल-
सूर्यफुलाच्या जातीतील हे एक फुल असून यास डहेलिया फूल असेही म्हणतात. हे फुल देखील ऑगस्ट महिन्यात लावता येते. हे रोप सूर्यप्रकाशात लावावे. त्याला दररोज ६ ते ८ तास सूर्यप्रकाश मिळावा, अशा ठिकाणी ठेवावे. या झाडाला चांगला निचरा आणि सुपीक माती आवश्यक असते. माती मोकळी करण्यासाठी खत घालावे. 

Web Title: Latest news Flowers Gardening Plant these flowers in month of August, here are some simple tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.