Join us
Daily Top 2Weekly Top 5

कादवा कारखान्याकडून 2800 रुपयांचा पहिला हफ्ता बँक खात्यात वर्ग, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:15 IST

Kadwa Sugar Factory : यापूर्वी प्रति मे. टन २५०० रूपये ऊस उत्पादकांना दिले असून फरकाची रक्कम कारखान्याने उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग केलेली आहे.

नाशिक :  दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाच्या बिलापोटी एफआरपीचा पहिला हप्ता प्रति मे.टन २८०० रूपये प्रमाणे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली. यापूर्वी प्रति मे. टन २५०० रूपये ऊस उत्पादकांना दिले असून फरकाची रक्कम कारखान्याने उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग केलेली आहे.

कादवा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू असून आजअखेर १ लाख १८ हजार ३५३ मे.टन ऊसाचे गाळप झाले आहे. सरासरी साखर उतारा १०.६३ टक्के आहे. तसेच १ लाख २५ हजार ७५० क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. तसेच कारखान्याचा डिस्टीलरी प्रकल्पही सुरू असून आतापर्यंत इथेनॉल ८,३७,८४४ आर.एस १३,७५,६२७ लिटर निर्मिती करण्यात आली आहे.

सध्या साखर उद्योग अत्यंत बिकट परिस्थितीतून जात असताना देखील कादवा सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत एफआरपी अदा करण्याची भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात सातत्याने सर्वाधिक ऊस दर देण्याची परंपरा कादवाने कायम राखली असून पुढेही जास्तीत जास्त ऊस दर देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे चेअरमन श्रीराम शेटे यांनी स्पष्ट केले.

कादवालाच ऊस पुरवठा करावाहंगाम संपल्यानंतर शासन नियमांनुसार अंतिम एफआरपी दर ठरणार असून, वेळेत एफआरपी अदा करत सर्वाधिक ऊस भाव देण्याची परंपरा कादवा सहकारी साखर कारखाना कायम ठेवणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही घाई न करता ठरलेल्या ऊस तोडणी कार्यक्रमानुसार ऊस तोड करून कारखान्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कादवालाच ऊस पुरवठा करावा, असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले. करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kadwa Factory Deposits ₹2800 First Installment into Bank Accounts

Web Summary : Kadwa Cooperative Sugar Factory disbursed ₹2800 per ton as the first installment of FRP to sugarcane farmers. Despite industry challenges, the factory has processed 1,18,353 tons of sugarcane with a 10.63% sugar recovery rate, committed to timely FRP payments and aims to offer the highest sugarcane prices.
टॅग्स :साखर कारखानेशेती क्षेत्रशेतीकृषी योजनाऊस