Join us

Fertilizer Information : वाशिम जिल्हा राज्यात अव्वल; शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन खत माहिती ब्लॉग वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 16:39 IST

Fertilizer Information : शेतकऱ्यांना आता खत मिळेल सहज आणि अचूक. वाशिमच्या कृषी विभागाने तयार केलेल्या ब्लॉगमुळे खतसाठ्याची माहिती मोबाईलवर एका क्लिकवर मिळणार आहे. यामुळे खरीप हंगामातील घाई, गैरसोय आणि वेळ वाचणार आहे. (Fertilizer Information)

Fertilizer Information : शेतकऱ्यांना आता खत मिळेल सहज आणि अचूक. वाशिमच्या कृषी विभागाने तयार केलेल्या ब्लॉगमुळे खतसाठ्याची माहिती मोबाईलवर एका क्लिकवर मिळणार आहे. यामुळे खरीप हंगामातील घाई, गैरसोय आणि वेळ वाचणार आहे.(Fertilizer Information)

खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक खताची माहिती वेळेवर न मिळाल्याने अनेक वेळा त्यांच्यावर तातडीचा खर्च आणि गैरसोय ओढवते. मात्र, वाशिमच्या कृषी विभागाने एक अभिनव पाऊल उचलत शेतकऱ्यांसाठी खतसाठ्याची ऑनलाइन माहिती देणारा ब्लॉग तयार केला आहे. (Fertilizer Information)

या ब्लॉगवर तालुकानिहाय, खतप्रकारानुसार आणि सेवा केंद्रनिहाय माहिती अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या सुविधेसाठी QR कोड आणि लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Fertilizer Information)

शेतकऱ्यांनी ही लिंक ओपन करावी किंवा क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर तालुक्याची आणि खतप्रकाराची निवड करून संबंधित सेवा केंद्राचा साठा पाहता येईल.(Fertilizer Information)

कशी मिळणार माहिती?

QR कोड स्कॅन करा किंवा दिलेली लिंक उघडा.

https://adowashim.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding.html 

आपला तालुका निवडा.

हवा तो खतप्रकार निवडा.

तालुक्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर किती साठा आहे, याची माहिती स्क्रीनवर दिसेल.

खत विक्रेत्यांना महत्त्वाची सूचना

खत विक्रेत्यांनी POS मशीनमध्ये दररोज साठा अपडेट करणे बंधनकारक आहे. चुकीची माहिती पोहचल्यास गोंधळ निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अचूक माहिती नोंदवावी, अशी सूचना कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्यभरात वाशिमचा पुढाकार

ही योजना सर्वप्रथम वाशिम जिल्ह्यात राबवली गेली. कृषी विभागाच्या प्रधान सचिवांनी दिलेल्या सूचनेनुसार वाशिमचे कृषी विकास अधिकारी अभिजीत देवगीरकर यांनी तातडीने पुढाकार घेत राज्यातील पहिला ब्लॉग तयार केला. 

या उपक्रमाचे यश पाहून प्रधान सचिवांनी सर्व जिल्ह्यांना असा ब्लॉग तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

वाशिमच्या कृषी अधिकाऱ्यांनी इतर जिल्ह्यांना या ब्लॉगच्या वापराबाबत प्रशिक्षणही दिले आहे.

प्रधान सचिवांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध खत साठ्याची अचूक माहिती देण्यासाठी 'ब्लॉग' विकसीत केला आहे. हा 'ब्लॉग स्पॉट' ओपन करण्यासाठी लिंक आणि क्यूआर कोडही उपलब्ध केला असून, या आधारे शेतकऱ्यांना खतसाठ्याची अचूक माहिती मिळणार आहे. - अभिजीत देवगीरकर, कृषी विकास अधिकारी, वाशिम

हे ही वाचा सविस्तर : Medicinal Plants Farming : औषधी शेतीकडे वळतेय वाशिम! 'आत्मा' यंत्रणेकडून शेतकऱ्यांसाठी नवा संजीवनी उपाय

टॅग्स :शेती क्षेत्रखतेशेतकरीशेतीवाशिमखरीप