Join us

Farmer Success Story : खचला नाही, लढला... अन् केळी पोहोचली थेट इराणच्या बाजारात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 18:09 IST

Farmer Success Story : केळीला समाधानकारक दर मिळत नसतानाही, बुलढाण्यातील वरवट बकाल येथील प्रगतशील शेतकरी सतीश टाकळकर यांनी आपल्या दर्जेदार उत्पादनावर विश्वास ठेवत थेट इराणला केळी निर्यात केली. नैसर्गिक आपत्तीनंतरही न खचता त्यांनी नव्या जोमाने शेती केली आणि आज ते संपूर्ण परिसरासाठी प्रेरणास्त्रोत बनले आहेत. (Farmer Success Story)

नारायण सावतकार

केळीला समाधानकारक दर मिळत नसतानाही, बुलढाण्यातील वरवट बकाल येथील प्रगतशील शेतकरी सतीश टाकळकर यांनी आपल्या दर्जेदार उत्पादनावर विश्वास ठेवत थेट इराणला केळी निर्यात केली. (Farmer Success Story)

नैसर्गिक आपत्तीनंतरही न खचता त्यांनी नव्या जोमाने शेती केली आणि आज ते संपूर्ण परिसरासाठी प्रेरणास्त्रोत बनले आहेत. (Farmer Success Story)

राज्यातील अनेक भागांमध्ये केळी उत्पादकांना समाधानकारक दर मिळत नसतानाही, संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल या छोट्याशा गावातील प्रगतशील शेतकरी सतीश टाकळकर यांनी जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचत एक आदर्श निर्माण केला आहे. (Farmer Success Story)

त्यांनी आपल्या शेतातील दर्जेदार केळी थेट इराणला निर्यात करत शेतकऱ्यांच्या यशाच्या मार्गावर भक्कम पाऊल ठेवले आहे.(Farmer Success Story)

दर्जेदार केळीचं उत्पादन आणि निर्यात

सातलोन नदीच्या काठी असलेल्या चार एकर क्षेत्रावर त्यांनी सुमारे ६ हजार खोडांची केळी लागवड केली. मुबलक पाण्याची उपलब्धता, सेंद्रिय खते, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत शेतीपद्धतींमुळे केळीचे उत्पादन दर्जेदार झाले. त्यामुळे त्यांच्या केळीला इराणमधून थेट मागणी आली.

या वर्षीच्या पहिल्या हंगामात २०० क्विंटल केळीचे उत्पादन झाले. १३ किलो वजनाच्या आकर्षक पॅकिंगमध्ये ही केळी निर्यात झाली. विशेष म्हणजे या निर्यातीसाठी प्रति क्विंटल १ हजार ५२५ रुपये इतका उच्च दर मिळाला. जो सध्या देशांतर्गत बाजारात दुर्मिळ आहे.

नैसर्गिक संकटावर मात करत मिळवले यश

गेल्या वर्षी आलेल्या अतिवृष्टीमुळे सतलोन नदीला पूर आला आणि संपूर्ण पिकाचे नुकसान झाले. मात्र, नैसर्गिक आपत्तीत खचून न जाता, सतीश टाकळकर यांनी पुन्हा नव्या जोमाने शेतीला सुरुवात केली. या संकटानंतरही त्यांनी हार न मानता सातत्याने मेहनत घेतली आणि आज त्यांच्या नावावर यशाची नोंद झाली आहे.

एक प्रेरणादायी शेतकरी

सतीश टाकळकर यांचे हे यश संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्यासोबत गावातील प्रदीप डाबरे, बाळू ढगे, रामचंद्र भुते, विनायक टाकळकर आणि अर्जुन टाकळकर या शेतकऱ्यांनीही निर्यात प्रक्रियेत सहभाग घेतला.

सतीश टाकळकर यांची कहाणी ही केवळ केळीच्या यशाची नाही, तर धैर्य, चिकाटी आणि नव्या संधींचा स्वीकार यांची साक्ष आहे. आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि मेहनत यांच्या जोरावर शेतकरी जागतिक बाजारपेठ गाठू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Farmer Successs Story : नोकरीशिवाय यशाची वाट सापडली; आधुनिक भाजीपाला शेतीतून मोठे यश वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीशेतकरी यशोगाथाकेळीफळे